धक्कादायक !! मोदींच्या हस्ते अनावरण झालेला शिवपुतळा वाऱ्याने कोसळला

धक्कादायक !! मोदींच्या हस्ते अनावरण झालेला शिवपुतळा वाऱ्याने कोसळला

*कोंकण Express*

*धक्कादायक !! मोदींच्या हस्ते अनावरण झालेला शिवपुतळा वाऱ्याने कोसळला*

*राजकोट किल्ल्यातील दुर्घटना; पुतळा बांधकामातील दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित*

*मालवण ः प्रतिनिधी*

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ४ डिसेंबर रोजी मोठ्या थाटामाटात अनावरण झालेला राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्याने कोसळल्याची धक्कादायक घटना आज दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या दुर्घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली असून पुतळ्याच्या बांधकामा बाबत प्रश्न उपस्थित झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 4 डिसेंबर रोजी नौदल दिन मालवणात साजरा झाला. या निमित्ताने राजकोट किल्ल्याचे नूतनीकरण करून येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. त्याचे अनावरण मोदींच्या हस्ते करण्यात आले. हा पुतळा आज दुपारच्या सुमारास कोसळला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या ठिकाणी शिवप्रेमी नागरिकांची गर्दी वाढली असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!