*ग्रुप ग्रामपंचायत ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांच्या वाढदिवसाचे औचित साधून श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप*

*ग्रुप ग्रामपंचायत ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांच्या वाढदिवसाचे औचित साधून श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप*

*कोंकण Express*

*ग्रुप ग्रामपंचायत ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांच्या वाढदिवसाचे औचित साधून श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप*

*वैभववाडी प्रतिनिधी-* प्रत्येक वर्षी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळे चे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे सामाजिक उपक्रम राबवतात यावर्षी देखील श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. वाढदिवसाच्या औचित्य साधून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना नवचैतन्य मिळाव आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात पटसंख्या व्हावी आणि जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना कोणती कमतरता भासू नये या दृष्टिकोनातून फुल ना फुलाची पाकळी या विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याची भावना काळे यांनी जपली प्रत्येक वर्षी वाढदिवसाच्या उचित साधून काळे यांनी आरोग्य शिबिरे,रक्तदान शिबिरे, आरोग्याचे साहित्य वाटप, शैक्षणिक क्षेत्रात मदत, कोरोना काळात देखील ग्रामपंचायत येथील कर्मचाऱ्यांना आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांना उपयुक्त वस्तू वाटप अशा विविध गोष्टीतून जनतेला,समाजाला, गावाला न्याय देण्याचे काम काळे यांच्या माध्यमातून नेहमीच होत आहे त्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत असून गावातील, समाजातील नवीन युवकांना त्यांच्याकडून प्रेरणा मिळते. सामाजिक कार्यात ते नेहमीच पुढाकार घेऊन जनतेला सहकार्य करण्याची भावना मनात जपतात त्यामुळे त्यांना जनतेने राजकारणामध्ये भरघोस यश दिलेले आहे. मिळाल्या यशाला माज आणि गर्व न करता ज्या जनतेने आपल्याला सहकार्य केले आहे त्या जनतेला आपण काहीतरी देणं लागतो या उदात्त भावनेने त्यांनी आपली समाजसेवा चालू ठेवली आहे. नवलराज काळे यांना वाढदिवसाच्या सर्व स्तरावरून शुभेच्छा मिळत आहेत.
शैक्षणिक साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाच्या वेळी संपूर्ण सडुरे शिराळे गावाच्या वतीने नवलराज काळे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला ग्रुप ग्रामपंचायत सडुरे शिराळे चे सरपंच दीपक चव्हाण, उपसरपंच आनंद जंगम, ग्रामपंचायत सदस्य श्री नवलराज काळे, विलास जंगम, सौ विशाखा काळे, रेश्मा बाणे, प्रियांका पाटील, दीक्षा रावराणे, रवळनाथ सोसायटी अध्यक्ष संतोष भोसले, तंटामुक्ती गाव समिती अध्यक्ष विठ्ठल काटे, माजी सरपंच विजय रावराणे,शिराळे भाजपा बूथ अध्यक्ष विजय पाटील, सडूरे भाजप बूथ सत्यवान डांगे, मनोहर बोडेकर, बबन रावराणे, माजी उपसरपंच संतोष पाटील, रमाकांत रावराणे, मालती रावराणे, दत्ताराम रावराणे, शुभांगी बोडेकर, आकाराम बोडेकर, भगवान बोडेकर, महेश डेळेकर, अंकिता डेळेकर, रसिका पाटील, चंद्रकांत डेळेकर, संदीप धामणे,प्रभाकर राणे, माजी पोलीस पाटील प्रकाश रावराणे, उदय रहाटे, जिल्हा परिषद शाळा शिराळे चे मुख्याध्यापक विनोद करपे व इतर शिक्षक इतर सर्व ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी व ग्रामपंचायत कर्मचारी सुनील राऊत, अशोक पाटील, कोतवाल मोहन जंगम व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!