*कोंकण Express*
*बाप्पाच्या आगमनापूर्वी ओसरगाव कळसुली रस्ता झाला चक्काचक्क !*
*सा. बां.विभागाचे वाहन चालकांसह ग्रामस्थांनी मानले आभार!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
गणपती बाप्पाचे आगमन अवघ्या काही दिवसावर येऊन राहिला आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सर्व रस्त्यांची साफसफाई आणि खड्डे बुजविण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत.
कणकवली तालुक्यातील ओसरगाव कळसुली प्रजिमा 30 सा. क्र. 20/000 ते 21/000 मध्ये खड्डे भरण्याचे काम सुरू करण्यात आले असल्याने ग्रामस्थांसह वाहनचालकांनी मानले सा. बां.विभागाने मानले आभार.
या कळसुली ओसरगाव रस्त्यावरील धोकादायक वळणावरील साईटपट्टीवर वाढलेली झाडी तोडून रस्ता वाहतुकीस निर्धोक केले असल्याने आता ग्रामीण भागातील रस्ते माञ चक्काचक्क होताना पहायला मिळत आहेत.