*कनेडी प्रशालेत रानभाज्या बाजार उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग*

*कनेडी प्रशालेत रानभाज्या बाजार उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग*

*कोंकण Express*

*कनेडी प्रशालेत रानभाज्या बाजार उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग*

*कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स कनेडी, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स कनेडी, बालमंदिर कनेडी प्रशालेत वार- गुरुवार, दिनांक- २२ ऑगस्ट २०२४ रोजी रानभाज्या बाजार उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.*

*मुलांना व्यवहार ज्ञान मिळावे, शाळेत प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना बाजाराचे आर्थिक ज्ञान मिळावे या हेतूने रानभाज्या बाजार विक्री हा उपक्रम प्रशालेतील इकोक्लब राष्ट्रीय हरित सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.*

*पावसाळ्यात कोकणात विविध प्रकारच्या रानभाज्या पाहायला मिळतात. अगदी माळरानावर, शेताच्या कडेने, घराच्या बाजूला विविध रानभाज्या नैसर्गिकरीत्या उगवतात सहज उपलब्ध होतात. यात अळू, पेवगा, टाकळा, फोडशी, घोटवेल, एक पानाजी भाजी, शेवगा, करटोली, कुर्डू, कुड्याच्या शेंगा अशा विविध प्रकारच्या भाज्या आपल्या परिसरात सापडतात. परंतु फास्ट फूडच्या जमान्यात नवीपिढी या नैसर्गिक रानभाज्यांना विसरत आहेत. या रानभाज्यांने आपल्या निरोगी आरोग्यासाठी फार महत्व आहे. विद्यार्थ्यांना या रानभाज्यांची ओळख व्हावी, रानभाज्यांपासून चविष्ठ पदार्थ तयार केले जाऊ शकतात तसेच मुलांना श्रम प्रतिष्ठेचे महत्व समजावे, यासाठी रानभाज्या विक्री या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.*

*या उपक्रमात इयत्ता पाचवी ते नववीचे विद्यार्थी सहभागी झाले. मुलांना प्रत्यक्ष बाजारातील खरेदी विक्रीचा अनुभव घेता आला. त्यामुळे भविष्यात त्यांना व्यवहार ज्ञानाचा अडथळा निर्माण होणार नाही.*

*संस्थेचे अध्यक्ष सन्मा.श्री. सतीश सावंत, शालेय समिती चेअरमन सन्मा. श्री.आर.एच.सावंत यांनी या उपक्रमाचे कौतुक करून मुलांचा उत्साह वाढवला. तसेच रानभाजी बाजारात विद्यार्थी व शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून भाज्या विकत घेतल्या. या उपक्रमाला प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य मा.श्री. सुमंत दळवी,पर्यवेक्षक मा.श्री. बयाजी बुराण, तसेच प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.*.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!