*कोंकण Express*
*कणकवली कलमठ विभागातील सातरल-कासरल येथे शिवसेना उ.बा.ठा पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न*
*युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व तालुकाप्रमुख कन्हैया पारकर यांची उपस्थिती*
*कणकवली ः प्रतिनिधी*
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार कणकवली विधानसभा मतदार संघात गाव दौरा बैठका सुरु आहेत. यात कणकवली कलमठ विभागातील सातरल – कासरल येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. आता येणाऱ्या विधासभेसाठी आपण एकत्र येत संघटननेच्या माध्यमातून आपल मशाल चिन्ह हे घरा-घरात पोहचवणे गरजेचे आहे. येत्या 2 महिन्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येणार हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. त्या सत्तेत आपल्या कणकवली विधासभेचा आमदार बसवणे हे आपल्या कार्यकर्त्यांचे काम आहे. त्यासाठी सर्वांनी एकजुटीने गावात काम करत येणाऱ्या विधासभेवर विजयाचा भगवा फडकवूया.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व तालुकाप्रमुख कन्हैया पारकर यांनी कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यावर उपाययोजना करण्यात येईल असे आश्वासन देखील दिले.गावातील रखडलेली विकास कामे असतील ती येत्या काळात आपली सत्ता आल्यावर आपण शिवसेनेचा माध्यमातून मार्गी लावून गावाचा चांगला विकास करूया .
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, सचिन सावंत, विभागप्रमुख अनुप वारंग,सुहास राणे, अनिल राणे, सुभाष राणे, रुपेश राणे, संदीप राणे, प्रवीण सावंत, मीनाक्षी सावंत, हनुमंत सावंत, विनायक सावंत, राजेंद्र कोकम, संतोष साटम, सुनील सावंत, सत्यवान कोकम, दामोदर परब, निलेश सावंत आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.