*कोकण Express*
*वाघेरी गावच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – सतीश सावंत*
*वाघेरी गावातील मुख्य रस्ता ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न….!*
*बौद्धवाडी ते लिंगेश्वर मंदिर मार्गावरील साकवाचे श्री.सावंत यांच्याहस्ते भूमीपूजन …!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
वाघेरी हे गाव माजी आमदार, शिक्षणमहर्षी स्वर्गीय केशवरावराणे साहेब यांचे जन्मगाव असून वाघेरी गावातील मुख्य रस्ता ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून करण्यासाठी आपण प्रयत्न करू. तसेच यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे व्यक्तिश: पाठपुरावा करु. अशी ग्वाही सतीश सावंत यांनी दिली. या गावच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना कटिबद्ध असेल असा विश्वास जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा शिवसेना नेते सतिश सावंत यांनी व्यक्त केला. जिल्हा वार्षिक योजना सन २०१९-२० मधून खासदार विनायक राऊत यांच्या शिफारशीनुसार व माजी पालकमंत्री तथा वित्त व नियोजन राज्यमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी ३५ लाख रुपये निधी मंजूर केलेल्या वाघेरी गावातील बौद्धवाडी ते लिंगेश्वर मंदिर या मार्गावर मोना ओहोळावर साकव भूमीपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, जि.प.तथा जिल्हा नियोजन मंडळ सदस्य संजय आग्रे, माजी सभापती संदेश पटेल, आनंद ठाकूर, संदीप सावंत, उत्तम सावंत, वाघेरी गावचे माजी सरपंच का.वा.राणे, उपसरपंच अनुजा राणे, ग्रा.पं. सदस्य तुकाराम गुरव, प्रकाश वाघेरकर, पोलीस पाटील अनंत राणे, युवासेना विभागप्रमुख सिद्धेश राणे, शाखाप्रमुख दत्तात्रय राणे उपस्थित होते.
यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या गावात शिवसेनेच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांबद्दल गावातून समाधान व्यक्त केले जात आहे.