राकेश नेवगी यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाची सावंतवाडी तालुक्यातील जाणीव जागर यात्रा पुढे ढकलली

राकेश नेवगी यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाची सावंतवाडी तालुक्यातील जाणीव जागर यात्रा पुढे ढकलली

*कोंकण Express*

*राकेश नेवगी यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाची सावंतवाडी तालुक्यातील जाणीव जागर यात्रा पुढे ढकलली*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

दिनांक 16 ऑगस्ट 2024 पासून रेडी, वेंगुर्ला या ठिकाणापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून जाणीव जागर यात्रेचे आयोजन केलेले आहे. ही यात्रा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात वेंगुर्ला, दोडामार्ग, सावंतवाडी तालुक्यातील गावा गावातून जाणार आहे.

दरम्यान आज दिनांक 19 ऑगस्ट रोजी पक्षाचे पदाधिकारी, सावंतवाडी शहर कार्याध्यक्ष राकेश नेवगी यांचे आकस्मित निधन झाले आहे. त्यामुळे 19 व 20 ऑगस्ट रोजी यात्रा थांबविण्यात आलेली आहे. तसेच सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बारा दिवसांचा दुखावटा पाळण्यात येणार आहे. सावंतवाडी तालुका व शहरातील नियोजित कार्यक्रम आणि यात्रा तात्पुरती थांबविण्यात आली आहे. बदल करण्यात आलेल्या तारखा नंतर कळविण्यात येतील. फक्त दोडामार्ग तालुक्यातील नियोजन झालेले कार्यक्रमच होणार आहेत.

नेवगी कुटुंबीयांच्यावर या आकस्मित घटनेने दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या दुःखात आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस परिवार सहभागी आहोत. त्यांच्या पावित्र आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!