*कोंकण Express*
*तळेरे येथे 36 दात्यांनी केले रक्तदान*
*सुनील तळेकर ट्रस्ट, वाचनालय आणि दळवी महाविद्यालयाचे आयोजन*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
तळेरे येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 36 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त रक्तदान केले. स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट, सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालय, विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी आदर्श महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तर सिंधुदुर्ग जिल्हा रक्तपेढी यांच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रारंभी ट्रस्टचे सचिव विनय पावसकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, माजी वित्त सभापती रवींद्र जठार, तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, उपसरपंच सौ. रिया चव्हाण, जिल्हा रक्तपेढीचे डॉ. संकेत रोटे, ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश तळेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत तळेकर, वाचनालयाचे अध्यक्ष राजू वळंजू, उपाध्यक्ष शशांक तळेकर, सचिव मिनेश तळेकर, तळेरे व्यापारी संघटना अध्यक्ष प्रवीण वरुणकर, डॉ. अभिजित कणसे, प्रा. हेमंत महाडिक आणि जिल्हा रक्तपेढीचे कर्मचारी उपस्थित होते.
दरवर्षी ट्रस्ट आणि वाचनालयाकडून वर्षातून दोनवेळा रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. यासाठी अनेकजण रक्तदान करतात. रक्तदानाशिवाय ट्रस्टकडून विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, धार्मिक उपक्रम आयोजित केले जातात. यावेळी हे रक्तदान शिबिर विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते.
यावेळी तळेरे येथील रक्तदाते आणि दळवी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. यावेळी जिल्हा रक्तपेढी चे श्रीम. प्रांजली परब, श्रीम. नेहा परब, श्रीम. कांचन परब, श्री. जोसेफ पिंटो, श्री. गणपत काडगे, श्री. नंदकुमार गावकर यांच्यासह अशोक तळेकर, माजी उपसरपंच दिनेश मुद्रस, शैलेश सुर्वे यांच्यासह ग्रामस्थ आणि दळवी महाविद्यालयाचे प्राध्यापक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हेमंत महाडिक तर आभार निकेत पावसकर यांनी मानले.

