*कोंकण Express*
*सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोलीच्या धावपटूंची राज्यस्तरीय निवड*
दि. 18 रोजी, सिंधुदुर्ग जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा ओरोस येथे पार पडल्या. ओरोस येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धेत सैनिक स्कूलच्या खेळाडूंनी नेत्रदिपक कामगिरी बजावली आहे.
कॅ. अथर्व निल्ले याने दमदार खेळी करत 1000 मीटर धावणे स्पर्धेत द्वितीय क्रमांक तर लॉंग जंपमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केला. कॅ.अवधूत पाटील याने 200 मीटर धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक तर 400 मीटर धावणे स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. कॅ. राज गुरव याने 100 मीटर धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक तर 400 मीटर धावणे स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. कॅ. स्वयम पाटील याने ट्रिपल जंप स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक तर लॉंग जंप स्पर्धेमध्येही प्रथम क्रमांक मिळवून नेत्रदिपक खेळाचे प्रदर्शन केले. कॅ. आशिष सावंत याने 400 मीटर धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. कॅ. निर्भय पाटील याने 200 मीटर धावणे स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला. कॅ. गिरीराज मुंडले याने 100 मीटर धावणे स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक आणि लाँग जंपमध्ये तृतीय क्रमांक पटकाविला.
सर्वच धावपटूंनी अतिशय दमदार खेळीचे प्रदर्शन करून सैनिक स्कूल आंबोलीचा दबदबा कायम राखला. आणि यातील प्रथम आणि द्वितीय क्रमांकांच्या खेळाडूंची राज्यस्तरासाठी निवड झाली आहे. ही सैनिक स्कूलसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
सर्व विजयी खेळाडूंचे आणि त्यांचे प्रशिक्षक श्री. अनिकेत पाटील व श्री. सतीश आईर यांचे अभिनंदन संस्था अध्यक्ष श्री. सुनील राऊळ, सेक्रेटरी श्री. जाॅय डाॅन्टस, कार्यालयीन सचिव श्री. दिपक राऊळ व सर्व संचालक मंडळ आणि प्राचार्य श्री. एन.डी. गावडे यांनी केले. तसेच सर्व राज्यस्तरीय खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस अनंत शुभेच्छा दिल्या.