*कोंकण Express*
*ऐश्वर्य मांजरेकर यांना राज्यस्तरीय शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर*
*सिंधुदुर्ग :-*
संजीवनी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणीजनांसाठी दरवर्षी राज्यस्तरीय शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. असे म्हणतात चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालायचं नसत, उंच भरारी घेणाऱ्याला, आभाळाच भय नसत… यंदा २०२४ यावर्षीचा राज्यस्तरीय शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार सिंधुदूर्ग जिल्ह्यातील ऐश्वर्य वसुंधरा जनार्दन मांजरेकर यांना जाहीर झाला आहे. संजीवनी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेमार्फत सामाजिक, युवा, राजकीय, सहकार, शिक्षण, उद्योग, कृषी, कला, महिला, क्रीडा, आरोग्य, पत्रकार आधी क्षेत्रात योगदान देणाऱ्या तरुणांना व समाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी अशा स्वरूपाचे पुरस्कार प्रदान करते. ऐश्वर्य मांजरेकर यांच्या युवा व सामाजिक क्षेत्रात असणाऱ्या उल्लेखनीय कार्याची दखल संजीवनी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेने घेतली. सदर पुरस्कार सोहळा नाशिक येथे आयोजित केलेला असुन सदर पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, मानाची शाल व फेटा असून मा. श्री. रविकांत तुपकर शेतकरी नेते मा. अध्यक्ष वस्त्रउद्योग महामंडळ, महाराष्ट्र शासन, मा. महादेवजी जानकर अध्यक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, मा. खासदार भाऊसाहेब वाकचौरे, मा. खासदार राजाभाऊ वाजे, मा. खासदार शोभाताई
बच्छऻव, पद्मश्री राहीबाई पोपेरे बिजमाता, मा. उदय सांगळे मा सदस्त पं. स सिन्नर ,संस्थेचे चेअरमन डॉ.ज्ञानेश्वर वसंतराव सानप यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. ऐश्वर्य मांजरेकर यांना राज्यस्तरीय शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२४ जाहीर झाल्याबद्दल समस्त सिंधुदूर्गवासियांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.