*कोंकण Express*
*फोंडाघाट गावातं एक राखी व्यसनमुक्तीच्या वचनाच*
या उपक्रमांतर्गत फोंडाघाट रिक्षा संघटना आणि टेम्पो संघटनेच्या सर्व सदस्य पदाधिकाऱ्यांना रक्षाबंधन करत व्यसनमुक्त राहण्याचा संदेश देण्यात आला
रिक्षा व्यावसायिकांनी व्यसनमुक्तीच्या प्रचाराचा केला संकल्प
नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य – शाखा सिंधुदुर्ग यांचे विद्यमाने आयोजन !
आज समाजामधील प्रत्येकासमोर मोठी प्रलोभने आहेत. कोणताही विचार न करता माणूस त्यांच्या आहारी जाऊन, उदासीनतेच्या नैराशेच्या गर्तेत जाऊन व्यसनाधीन होतो. दारू – जुगार – गुटका – मटका इत्यादी व्यसनांच्या आहारी जाऊन कित्येकदा कुटुंब – संसार उध्वस्त होते. घरातील माणसे व्यसनाधीन सदस्याचा तिरस्कार करू लागतात. यातून सावरण्यासाठी नशाबंदी मंडळ, सिंधुदुर्ग शाखा आपल्याला सहकार्याची हाक देत असून पुढे आली आहे. रिक्षाचालकांनी प्रवाशांसह व्यसनमुक्तीच्या प्रचाराचे वाहक बनून स्वतःचे आणि समाजाला दिशा दाखवावी, असे मार्गदर्शक आवाहन करतानाच व्यसनमुक्त सिंधुदूर्गावर कविता सादर करून नशाबंदी मंडळ शाखा सिंधुदुर्ग चे अध्यक्ष श्रावणी मदभावे यांनी मार्गदर्शन केले.
नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य – मुंबई, शाखा सिंधुदुर्ग आणि फोंडाघाट एस.टी रिक्षा स्टॅन्ड यांच्या विद्यमाने”व्यसनमुक्तीचे बंधन, व्यसनापासून संरक्षण” या अभियांतर्गत ‘व्यसनमुक्तीची राखी’ बंधनाचा कार्यक्रम एसटी स्टँडवर घेण्यात आला. शुभारंभ पोलीस कॉन्स्टेबल वंजारी यांचे हस्ते रिक्षावर घोषवाक्य लावून करण्यात आला. यावेळी त्यांनी या अभियानाच्या प्रचारासाठी वचनबद्ध राहण्याचे सुचित केले. नशाबंदी सिंधूदुर्ग जिल्हा समितीचे उपाध्यक्ष सुनील कांबळे यांनी प्रास्ताविक केले. स्टँडचे कंट्रोलर होळकर यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
नशाबंदी मंडळ मंडळ शाखा सिंधुदूर्गच्या प्रवक्त्या मेघा गांगण यांनी समितीचे कार्य आणि आवश्यकता विशद करताना, आज आम्ही तुमच्यासमोर नशाबंदीचा हात पुढे केला आहे. त्याचा प्रचार आणि प्रसार करून समाज नशामुक्त करण्यासाठी प्रयत्न करू या, असे आवाहन केले.
संघटक मुंबरकर यांनी व्यसनमुक्ती वरील माहिती दिली. रिक्षाचालक ग्रामस्थ यांना सजग केले. तसेच सर्व उपस्थिताना व्यसनमुक्तीची शपथ दिली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांना, रिक्षा चालक ग्रामस्थ यांना व्यसनमुक्तीची राखी बांधण्यात आली. आभार प्रदर्शन संयोजक राजेंद्र कदम यांनी केले.
यावेळी रुपेश मेजारी, सुहास सावंत, पारस कासले, लक्ष्मण गोसावी, संतोष चव्हाण, संजय पेडणेकर, संजय धुमक, अजय कार्लेकर, दिगंबर रावराणे, गणेश मराठे, प्रमोद रावराणे, रुपेश पाटील, एकनाथ पवार, प्रीतम घाडी, चंद्रकांत मडव, गजानन पेडणेकर, मोतेच पिंटो, किरण पेडणेकर, अजय चिके, भाऊ कुडतरकर, नीलकंठ रावराणे, भरत चीके, अजय कदम, बाळू पाटील, रवींद्र कदम, शुभम शेळके, संतोष खांडेकर, इत्यादी रिक्षा चालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.@highlight
#nashabandi
#NashaMuktBharatAbhiyaan
#nashamuktbharat
#Vyasanmukti
#Anil Nerurkar