*कोंकण Express*
*प्रशासनाच्या निष्क्रियतेच्या विरोधात उपोषणाचा चौथा दिवस, न्याय मिळण्याची प्रतीक्षा*
श्री चंद्रशेखर दशरथ रावराणे लोरे नं.1 येथील ग्रामस्थ ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग यांनी 15 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर प्रशासनाच्या अन्यायकारक व निष्क्रिय वागणुकीच्या विरोधात उपोषण सुरू केले आहे. आज उपोषणाचा चौथा दिवस आहे, तरीही प्रशासनाकडून अद्याप कोणताही ठोस प्रतिसाद मिळालेला नाही. यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आणि न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
श्री चंद्रशेखर दशरथ रावराणे व लोरे नं.1 ग्रामस्थ यांनी ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमणाच्या समस्येबाबत प्रशासनाकडे तक्रार दाखल केली होती. ग्रामपंचायत हद्दीत अतिक्रमण झाल्यामुळे गावातील सामान्य नागरिकांच्या जीवनावर आणि सार्वजनिक सोयी-सुविधांवर मोठा परिणाम होत आहे. परंतु, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि निष्क्रियतेमुळे ही समस्या अद्याप सुटलेली नाही.
ग्रामपंचायत हद्दीतील या अतिक्रमणामुळे गावातील अनेक नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे श्री चंद्रशेखर दशरथ राव राणे व लोरे नं.1 ग्रामस्थ यांनी 15 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषणाचा मार्ग निवडला आहे. आज चौथ्या दिवशीही प्रशासनाने कोणताही प्रतिसाद दिलेला नाही, त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी असंतोष वाढला आहे.
श्री चंद्रशेखर दशरथ रावराणे आणि लोरे नं.1 ग्रामस्थ यांनी प्रशासनाला विनंती केली आहे की, ग्रामपंचायत हद्दीत झालेले अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे आणि त्यांच्या तक्रारीचे योग्य निराकरण करण्यात यावे. अन्यथा, उपोषणाची तीव्रता वाढवण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
श्री चंद्रशेखर दशरथराव राणे व लोरे नं.1 येथील ग्रामस्थ