*कोकण Express*
*उद्योग परवान्यांसाठी एक खिडकी योजना सुरू करण्याकरीता सरकार प्रयत्नशील*
उद्योगांना आवश्यक असलेल्या विविध परवानग्या आणि मंजुरी एकाच ठिकाणी मिळाव्या यासाठी एक खिडकी योजना कार्यान्वित करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश यांनी काल राज्यसभेत प्रश्नोत्तरांच्या तासात दिली.
यासाठी एक राष्ट्रीय स्तरावरील पोर्टल निर्माण करण्यात येईल, ज्यामुळे उद्योजकांची विविध विभागांकडे होणारी धावपळ कमी होईल असं सोम प्रकाश पुढे म्हणाले.