*कोंकण Express*
*भारतीय मजदूर संघाच्या जिल्हा कोषाध्यक्षपदी ओमकार दिपक गुरव यांची निवड*
*जिल्ह्याच्या कोषाध्यक्षपदी साळिस्ते गावाचा सुपुत्र*
रविवार दिनांक १८/०८/२०२४ रोजी झेलेल्या जिल्हा अधिवेशनात साळिस्ते गावचे सामाजिक कार्यकर्ते तथा भारतीय मजदूर संघाचे सक्रिय कार्यकर्ते ओमकार दिपक गुरव यांची भारतीय मजदूर संघाच्या कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
ओमकार गुरव हे गेली काही वर्षे वडिलांच्या निधनानंतर वडिलांची अपूर्ण राहिलेली सर्व स्वप्न पूर्ण करण्यासाठी सामाजिक क्षेत्रात प्रामाणिकपणे कार्यरत आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेत भारतीय मजदूर संघाच्या प्रदेश पदाधिकारी यांनी भारतीय मजदूर संघ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हा अधिवेशनात भारतीय मजदूर संघाच्या महत्वाच्या पदी निवड केलेली आहे.
भारतीय मजदूर संघ तळेरे प्रभाग, त्याचबरोबर भारतीय मजदूर संघ कणकवली, वैभववाडी, देवगड उपविभागामध्ये सध्या ते हजारो कामगार वर्गाचे नेतृत्व करत आहेत. विशेष म्हणजे रत्नागिरी मधील राजेंद्र माने कॉलेजमध्ये त्यांचे उच्च शिक्षण सुरू आहे. अश्या या तळागाळात प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची भारतीय मजदूर संघाने दखल घेत जिल्ह्याची महत्वाची जबाबदारी सोपविलेली आहे. आतापर्यंत त्यांनी भारतीय मजदूर संघाने दिलेल्या असंख्य जबाबदाऱ्या पेललेल्या आहेत म्हणजेच संघटनमंत्री म्हणून असो किंवा बांधकाम कामगार महासंघाचा कोषाध्यक्ष पद असो अश्या विविध पदांवर त्यांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे. ओमकार गुरव यांच्या या निवडीबद्दल भारतीय मजदूर संघ तळेरे प्रभागामध्ये सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.