*कोंकण Express*
*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत पर्यावरण पुरक राखी प्रदर्शन व विक्री*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले.*
विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत पर्यावरण विभाग व हरितसेना विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नातून नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून प्रशालेत स्वतः विद्यार्थांनी तयार केलेल्या पर्यावरण पुरक राखींचे प्रदर्शन भव्यदिव्य प्रमाणात भरविण्यात आले होते पर्यावरण विभाग प्रमुख श्री प्रसाद राणेसर श्री शेळके जेजे सर सौ शिरसाठ मॅडम सौ तायशेटे मॅडम यांनी प्रशालेतील पाचवीते दहावी पर्यंतच्या विद्यार्थांना पर्यावरण पुरक राखी बनविण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांच्या कलेला प्रोत्साहन दिले कलात्मक तेने सजविलेले राखी प्रदर्शन प्रशालेच्या वातारणात धुंद होऊन गेले होते वृक्षांच्या बियांचा प्रसार ‘ राष्ट्रभावना जपण्याचे विचार ‘ तसेच वृक्ष लागवीचा संदेश . राखीतून सर्वविद्यार्थ्यांना दिला पाहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थांनी प्रदर्शनाची पाहाणी केली आणि मोठ्या प्रमाणात विकत घेतली त्यातून स्वयंम अर्थ निर्मिती व्यवसायाचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळाले प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पिराजी कांबळे सरांनी प्रदर्शनाची पहाणी करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि शुभेच्छा दिल्या पर्यवेक्षक सौ जाधन मॅडमनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले प्रशाळेतील सर्व शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या