*कोंकण Express*
*निलम राणे हिला जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त*
*शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान*
*निलम राणेवर होतोय अभिनंदनाचा वर्षाव*
*कणकवली ः प्रतिनिधी*
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग द्वारा जिल्हा युवती पुरस्कार सन २०२३ – २४ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या युवा सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करुन जिल्ह्याचा मान वृद्धिंगत केल्याबद्दल निलम राणे हिला १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते “जिल्हा युवती पुरस्कार ” प्रदान करण्यात आला.
निलम राणे हिने केलेल्या यशस्वी कामगिरीबद्दल आणि पुरस्काराबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्र स्तरावर गौरवोद्गार काढले जात आहेत. या पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, रोख रक्कम आहे.
या सोहळ्या प्रसंगी सिंधुदूर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशोर तावडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी रवी पाटील, पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, सिंधुदुर्ग, अपर पोलीस अधिक्षक कृषिकेश रावले, सिंधुदुर्ग, जिल्हा क्रिडा अधिकारी विद्या शिरस उपस्थितीत होते.