*कोंकण Express*
*सावंतवाडी शहरांमध्ये डेंगूसदृश्य रुग्ण आढळले ; उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांवर उपचार सुरू*
*जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी भेट घेऊन आरोग्य अधिकाऱ्यांना याबाबत दिली माहिती*
*सावंतवाडी शहरांमध्ये डेंगूसदृश्य रुग्ण उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार घेत असून जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी भेट घेऊन लगेचच सावंतवाडी नगरपालिका आरोग्य विभागातील आरोग्य अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली*
*तसेच सालईवाडा कळसुलकर हायस्कूल च्या पाठीमागे हा रुग्ण राहत असून कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या पाठीमागे नाला असून नाल्यामध्ये अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य सापडले असून व पाण्याची डबकी त्या नाल्यामध्ये झाल्याने डेंगू लागण दुर्गंधी पाण्यामुळे व त्या डबक्यामुळे डेंगूसदृश पैदात त्यामध्ये मच्छर झाले असून योग्य तो आरोग्य विभागाकडून सफाई करून जिथे दुर्गंधीचे डबके असतील ते बाजूला करून व फवारणी करून वेळेस उपचार करावा असे नगरपालिकेच्या आरोग्य विभागाला व अधिकाऱ्यांना सांगितले असून लगेच इतर रुग्ण वाढू नये म्हणून वेळीच उपचार नगरपालिकेने चालू केले*
*त्या भागामध्ये फवारणी करणे आणि रुग्ण वाढू नये म्हणून खबरदारीचा उपाय नगरपालिकेचे अधिकाऱ्याकडून करून घेतल्यामुळे जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी समाधान व्यक्त केले आहे*
*रुग्णाला डेंगू झाल्यामुळे ताप येऊन रक्तातील प्लेटलेट अडीच लाखाहून कमीत कमी होत असतात विविध उपचार न झाल्यास 40 ते 50 हजार प्लेटलेट्स झाल्यास रुग्णाला गोवा बांबुळी येथे रुग्णाला पाठवावे लागतात*
*यामुळे तोंडातून व नाकातून रक्तस्त्रा होऊन रुग्ण गंभीर होत असतो यासाठी सर्व जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या राहत्या घरापासून आजूबाजूस अशा प्रकारचे घाणीच्या साम्राज्याचे पाण्याचे डबके असल्यास त्यावर डबके मोकळे करून बीचिंग पावडर किंवा जळके ऑइल त्या डबक्यामध्ये टाकावे यामुळे आपला रुग्ण डेंगूमुळे प्लेटलेट कमी झाल्यास गंभीर होणार नाही याची काळजी घ्यावी*
*त्याचप्रमाणे घराच्या आजूबाजूस फुल झाडांच्या कुंड्या असल्यास त्यामध्ये पाणी साठल्यास तिथे सुद्धा अशा प्रकारचे डेंगू चे मच्छर अळी घालून आपल्या घरामध्ये हे मच्छर चावा घेतल्याने डेंगूसदृश्य ताप येऊन आपल्याला रुग्णालयात यावे लागते याची सर्व जनतेने काळजी घ्यावी*
*त्याचप्रमाणे मलेरियाचे रुग्ण ताप येऊन रुग्णालयात येत असतात मलेरिया हा ताप आजूबाजूस अस्वच्छता त्याचप्रमाणे आपण आपल्या राहत्या घरी आजूबाजूस झाडी वाढल्यास ती आपण साफ करावी त्यामुळे सायंकाळच्या वेळी मच्छर येऊन मलेरिया सारखा ताप रुग्णाला येत असतो*
*तसेच टायफड चा ताप हा विहिरीतील पाणी जाडे मीठ तुरटी क्लोरीन पावडर ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेमधून आणून टाकल्यास पाण्यामध्ये जंतू निर्माण होऊन टायफड ताप तसेच कावीळ ताप व सतत जुलाब होणे रुग्णाला होत असते याची काळजी पूर्वीच्या काळी अशिक्षित नागरिक त्या काळात घेत होते परंतु आजकालच्या नागरिकांना मोबाईलच्या धुंदीत असल्याने असे गोष्टी काळजी न घेतल्यास रुग्णालयात यावे लागते*
*रुग्ण हा कॉट वरती असतो रुग्णाचे नातेवाईक रात्रीच्या वेळी जमिनीवरती झोपावे लागतात सरकारी हॉस्पिटलमध्ये असे रुग्ण वाढू नये म्हणून जर काळजी घेतल्यास आपल्याला रुग्णालयात यायची पाळी येऊन येणार नाही याची दक्षता नागरिकांनी घ्यावी*
*अशी माहिती जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष सावंतवाडी राजू मसूरकर यांनी दिली आहे*
◼️◼️◼️◼️◼️◼️◼️◼️◼️◼️
*आपला विश्वासू*
*राजेंद्र प्रभाकर मसुरकर*
*जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोन्याचा चांदीच्या दागिन्यांचे व्यापारी*
*उभा बाजार सावंतवाडी*
*जिल्हा सिंधुदुर्ग*
*मोबा. 9422435760*