*कोंकण Express*
*कोळपे जिल्हा परिषद मध्ये “भगवा सप्ताह” च्या गाव बैठका संपन्न*
*विधानसभा प्रमुख सतीश सावंत व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची उपस्थिती*
*जांभवडे च्या माजी सरपंच वैदेही गुरव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी केला उ. बा. ठा शिवसेनेनेत प्रवेश*
*जांभवडे युवासेना शाखाप्रमुख पदी राजेंद्र गुरव व मौदे युवासेना शाखाप्रमुख पदी पंढरीनाथ ढापले यांची करण्यात आली नियुक्ती*
*कणकवली ः प्रतिनिधी*
भगवा सप्ताह निमित्ताने कोळपे जिल्हा परिषद येथील जांभवडे,सौंदळ, मौदे, एनौटी व भुईबावडा या गावात गाव दौरा बैठका संपन्न झाल्या. यावेळी विधानसभा प्रमुख सतीश सावंत व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत विधानसभा निवडूकीच्या प्राश्वभूमी वर पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या व संघटना बांधणीसाठी प्रचार कमेटी नेमण्यात आल्या. यावेळी जांभवडे शाखाप्रमुख पदी राजेंद्र गुरव व मौदे शाखाप्रमुख पदी पंढरीनाथ ढापले यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी जांभवडे गावच्या माजी सरपंच वैदेही गुरव यांच्यासह योगेश गुरव, राजेंद्र गुरव, बाबू राठोड, भिवाजी घाटकर, राजाराम गुरव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी विधानसभा प्रमुख सतीश सावंत व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला.
यावेळी विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी मार्गदर्शन केले. येणाऱ्या काळात काळात कणकवली विधासभेवर भगवा फडकवण्यासाठी सज्ज होऊन काम करूया. एक जुटीने काम केल्यास विजय हा निश्चित आहे.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी देखील मार्गदर्शन केले. भगवा सप्ताह निमित्ताने प्रत्येक गावा-गावात प्रचार कमेटी नेमून देण्यात आली आहेत. या कमेटी ने गावात जोमाने काम करणे गरजेचे आहे.
यावेळी विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, युवासेना जिल्हा सरचिटणीस स्वप्निल धुरी, योगेश गुरव, राजेंद्र गुरव, बाबू राठोड, भिवाजी घाटकर, राजाराम गुरव,शामसुंदर इंदुलकर, जगन्नाथ इंदुलकर,अक्षय इंदुलकर, राजू घागरे, प्रांजल इंदुलकर, सुरेखा चाळके, बाळा साहिल, बंड्या पांचाळ, सुरेश गुरव, वसंत मोटे,धनाजी नागम, जोन्सा मोटे,जगन्नाथ मोरे, विलास मोरे, रमेश मोरे, बाबा मोरे, प्रमोद मोरे , राजेंद्र मोरे, सखाराम गुरव, मनोहर मोरे आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.