*कोंकण Express*
*सावंतवाडी येथे मोटापा शिबीराचे उदघाटन*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
पतंजली योग समिती सिंधुदुर्ग आयोजित कळसुलकर हायस्कूल सावंतवाडी येथे आज दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी लठ्ठपणा असणाऱ्यांसाठी विशेष योग शिबीर अर्थात मोटापा शिबिर चालू करण्यात आले. श्री श्रीधर पाटील तहसीलदार सावंतवाडी हे या शिबिराला उदघाटक म्हणून लाभले , तसेच पतंजली योगसमिती सिंधुदुर्ग चे जिल्हा प्रभारी श्री शेखर बांदेकर हे शिबिर अध्यक्ष म्हणून लाभले, त्यावेळी श्री महेश भाट, श्री दत्तात्रय निखार्गे , श्री लक्ष्मण पावसकर आदी उपस्थित होते.
श्री रवींद्र प्रभुदेसाई यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन श्री पावसकर यांनी केले. दीप प्रज्वलनाने उद्घाटन झाल्यानंतर योग वर्ग घेण्यात आला. सूक्ष्म व्यायाम, सूर्यनमस्कार, योगासन, प्राणायाम असा अभ्यास केला गेला. सदर चे मोटापा शिबिर हे 16 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर पर्यंत चालू राहील, काही ठराविक जागाच शिल्लक आहेत त्यामुळे आपले रजिस्ट्रेशन आजच करून घ्या, तसेच लठ्ठपणा ही आजची गंभीर समस्या आहे त्यामुळे सावंतवाडी मधील सर्व जनतेने या योगशिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन उदघाटक श्री श्रीधर पाटील यांनी केले.