*कोंकण Express*
*सलग तिसऱ्या दिवशी लोरे नं.1 गावातील रस्त्यावरील अतिक्रमणविरोधात उपोषण*
*ग्रामस्थ चंद्रशेखर दशरथ राणे यांची माहिती*
15 ऑगस्ट 2024 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोरे नं.1 गावातील ग्रामस्थांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. आज उपोषणाचा तिसरा दिवस असून, ग्रामस्थांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणाविरोधात आपला आवाज उठविला आहे.
लोरे नं.1गावातील सरपंचाने रस्त्यावर अतिक्रमण केल्याची तक्रार ग्रामस्थांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे वारंवार केली होती. परंतु, प्रशासनाकडून या तक्रारीवर अद्याप ठोस पावले उचलली गेली नाहीत.
या तक्रारींवर दुर्लक्ष केले जात असल्याने आणि अतिक्रमणधारकांना समर्थन दिले जात असल्याचा संशय निर्माण झाल्यामुळे, गावातील सर्व नागरिकांनी उपोषणाचे हत्यार अवलंबले आहे. 15 ऑगस्ट, हा आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन असला तरी लोरे नं.1 ग्रामस्थांना अजूनही पारतंत्र्यात असल्याचा अनुभव येत आहे.
ग्रामस्थांचे हे आंदोलन अधिकाऱ्यांनी आणि समाजातील काही राजकीय समाजकंटकांनी दुर्लक्ष केल्यामुळे उभे राहिले आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन अतिक्रमण काढण्याबाबत त्वरित ठोस पावले उचलावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
असा इशारा यानिमित्त प्रशासनाला देण्यात आला असून, प्रशासन ठोस पावले उचलेल, अशी आशा आहे. अन्यथा, ग्रामस्थांचे आंदोलन आणखी तीव्र होईल.
याचबरोबर, लोरे नं.1 ग्रामस्थांनी पत्रकार बांधवांना आवाहन केले आहे की, पत्रकार हा न्यायव्यवस्थेचा तिसरा स्तंभ मानला जातो, आणि त्यांनी या परिस्थितीत आवाज उठवावा. ग्रामस्थांना आशा आहे की पत्रकार बांधव या प्रश्नाची दखल घेऊन, त्यांच्यासाठी न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करतील.