*कोंकण Express*
*ग्रामपंचायत सदस्य राहुल परब व कुंभारमाठ ग्रामस्थ यांचे जिल्हाधिकारी कार्यालय येथे ग्रामपंचायत कुंभारमाठ यांच्या भोंगळ कारभार विरोधात उपोषण*
*जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी १५ दिवसात चौकशी पुर्ण करण्याचे गट विकास अधिकारी पं स. मालवण यांना आदेश*
जनसुविधा विशेष अनुदान योजनांतर्गत २०२३-२०२४ मधुन कुंभारमाठ जरीमरीवाडी अंगणवाडी ते बिलये घर रस्ता प्रस्तावित आहे तरी सदर रस्ता संदर्भात वारंवार मागणी करूनही ग्रामपंचायत कुंभारमाठ यांनी प्रस्ताव दिला नाही तसेच सदर रस्ता समोर अंगणवाडी असल्याने लहान मुलांना चिखलातुन अंगणवाडीत प्रवेश करावा लागत आहे तसेच कुंभारमाठ गावचे तलाठी कार्यालय येथेच आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना चिखलातुन तलाठी कार्यालयात प्रवेश करावा लागत आहे तसेच तेथील दत्तनगर ग्रामस्थांना सुध्दा याचा त्रास होतो आहे तरी या संदर्भात ग्रामपंचायत सदस्य राहुल परब व ग्रामस्थ गौरव बिलये, हर्षद बिड्ये, दामोदर गवई, अस्मिता वालावलकर यांनी या संदर्भात ग्रामपंचायत कुंभारमाठ यांच्या भोंगळ कारभार विरोधात उपोषण उपोषण केले व या संदर्भात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी १५ दिवसात चौकशी पुर्ण करण्याचे गट विकास अधिकारी पं स. मालवण यांना आदेश दिले आहेत