*कोंकण Express*
*हु. भास्कर पांडुरंग कर्णिक स्मारक, करूळ येथे स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण उत्साहात संपन्न*
*करूळ पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खजिनदार दीपेश कर्णिक यांच्या हस्ते ध्वजारोहण*
देशाच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनी हु. भास्कर पांडुरंग कर्णिक स्मारक, करूळ येथे करूळ पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खजिनदार श्री. दीपेश दत्तात्रय कर्णिक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, यावेळी करूळ गावच्या सरपंच सौ. समृद्धी नर, माजी सरपंच श्री. बबन कर्णिक, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, शासकीय प्रतिनिधी, ग्रामस्थ, नाथ पै ज्ञान प्रबोधिनी हायस्कुल करूळ चे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपास्थित होते.