*कोंकण Express*
*नवीन कुर्ली प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात धरणग्रस्त यांनी छेडले आमरण उपोषण*
*राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमितजी सामंत, कणकवली तालुका अध्यक्ष अनंत पिळणकर धरणग्रस्तांना दिला पाठिंबा*
नवीन कुर्ली प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात नवीन कुरलीतील धरणग्रस्त 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधून आमरण उपोषणाला बसले आहे हरीश पाटील यांनी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांना निवेदन दिले. त्यांचे हे निवेदन स्वीकारून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, तालुकाध्यक्ष आनंत पिळणकर यांनी पाठिंबा दर्शविला आहे. यावेळी उपोषण करते -चंद्रशेखर रावराणे ,निलेश रावराणे, अमित रावराणे ,रमेश रावराणे, विशाल रावराणे, प्रीतम रावराणे या उपोषणकर्त्यांना राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमितजी सामंत साहेब कणकवली तालुका अध्यक्ष अनंत पिळणकर कणकवली विधानसभा अध्यक्ष देवेंद्र पिळणकर यांनी भेट दिली व अमित सामंत यांनी उपोषणकर्त्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे सांगितले