२२ देशांकडून कोरोना प्रतिबंधक लसींची भारताकडे मागणी

२२ देशांकडून कोरोना प्रतिबंधक लसींची भारताकडे मागणी

*कोकण Express*

*२२ देशांकडून कोरोना प्रतिबंधक लसींची भारताकडे मागणी*

जगभरातल्या २२ देशांनी भारताकडं कोरोना प्रतिबंधक लसींचीमागणी केली असल्याची माहिती आरोग्य मंत्रीहर्ष वर्धन यांनी काल लोकसभेत दिली. भारतानं आतापर्यंत १५ देशांना लस पुरवठा केलाआहे. २ फेब्रुवारीपर्यंत लसीच्या ५६ लाख मात्रा मदत म्हणून, तर १०५ लाख मात्रा करारान्वयेदिल्याची माहिती हर्ष वर्धन यांनी दिली.

दरम्यान, लसीकरण मोहिमेदरम्यान भारतानंसर्वाधिक वेगाने ५० लाख मात्रांचा टप्पा ओलांडला आहे. केवळ २१ दिवसांमध्येचभारतानं हे साध्य केलं आहे. हा टप्पा गाठण्यासाठी अमेरिकेला २४, ब्रिटनला ४३ तर, इस्राईलला ४५ दिवस लागले.

काल संध्याकाळपर्यंत भारतात ५२ लाख ९० हजार ४७४ जणांना लस देण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मनोहर अग्नानीयांनी माध्यमांना दिली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!