*कोंकण Express*
*सरंबळ येथील घरातील कमवता मुलगा अपघातात दगावल्याने मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेतून तात्काळ आर्थिक मदत व्हावी*
*शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसर यांनी केली मागणी*
कुडाळ तालुक्यातील सरंबळ जि.सिंधुदुर्ग येथील नुकतेच आय टी इजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात असणारा मुलगा कै.शुभम परब यांचा सरंबळ ते कुडाळ प्रवासादरम्यान एस.टी बस व मोटरसायकल यांच्यामध्ये अपघात झाला.हा अपघात इतका जबर होता की कै.शुभम यांना रुग्णालयात दखल केले असता त्यांना मृत असे घोषित केले.शुभम यांच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने व त्यांच्या कुटुंबाचा आधार गेला त्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांची परिस्थिती हलाखीची बनली आहे तरी त्यांना आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेतून किंवा अन्य कोणत्याही योजनेतून तात्काळ आर्थिक मदत मिळण्यासाठी आपल्याकडून योग्यती कार्यवाही व्हावी,ही नम्र विनंती.कळावे.