*कोंकण Express*
*नवीन कुर्ली गावात वयोश्री कॅम्प ला उत्स्फूर्त प्रतिसाद*
*नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाकडून आयोजन*
राज्य सरकारच्या वयोश्री योजनेची माहिती आणि अर्ज जमा करून घेण्यासाठी नवीन कुर्ली येथे नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाने विशेष कॅम्प चे आयोजन केले होते. या कॅम्प ला गावातील जेष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ग्रामविकास मंडळाने आयोजित केलेल्या विशेष कॅम्प मध्ये वयोश्री योजनेची आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज भरून घेण्यात आले. या योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट ३ हजार रुपये जमा होणार आहेत. विविध आरोग्यविषयक उपकरणे खरेदी करण्यासाठी राज्य सरकारकडून वयोश्री योजनेचा लाभ देण्यात येत आहे.
या प्रसंगी माजी सभापती मनोज रावराणे, नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कोलते, अमित दळवी, सुरज तावडे, नवीन कुर्ली भाजपा बूथ अध्यक्ष अतुल डऊर, सहदेव परब , सदानंद पाटील, कृष्णा परब , महादेव कदम, शिवाजी तावडे, अनंत चव्हाण, पांडुरंग पार्टे, दिलीप वैराग, अरुण चव्हाण, शांताराम पारखे, शिवाजी चव्हाण, पांडुरंग चव्हाण, अंकुश पिळणकर, प्रमोद पवार, मनोहर तेली, मंगेश तेली , वसंत येंडे, धोंडू चव्हाण,चंद्रकांत मर्गज, अंजनी मडवी, मनीषा पाटील, आनंदी पवार, सुहासिनी मुंज, सत्यवती कोलते, सुनिता राणे, आदी ग्रामस्थ व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.