*कोंकण Express*
*माध्यमिक विद्यामंदिर कनेडी हायस्कूलमध्ये तालुकास्तरीय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा संपन्न*
*कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स कनेडी, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स कनेडी आणि बालमंदिर कनेडी येथे मंगळवार दिनांक १३ ऑगस्ट २०२४ रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून माजी गुरुवर्य पुरस्कृत, माजी मुख्याध्यापक कै.सिताराम सखाराम नाडकर्णी, कै. बालाजी सिताराम सावंत, कै. सुरेश सहदेव पेंडूरकर , माजी पर्यवेक्षक कै. प्रबोध शांताराम सावंत, कै. कृष्णराव हैबतराव जाधव, माजी सहा.शिक्षक कै.सखाराम आत्माराम सावंत, कै. मल्हारराव धाकजी सावंत, कै. दयाळ वासुदेव सावंत, कै. टोपाण्णा कृष्णा कानडे, कै.मधुकर केशव कुलकर्णी, माजी सहा. शिक्षिका कै. श्रीम. स्नेहलता मधुकर कुलकर्णी, कै. सौ प्रज्ञा प्रभाकर सावंत ( मा. श्री. प्रभाकर अनाजी सावंत माजी सहा. शिक्षक यांच्या दिवंगत पत्नी), माजी प्रयोगशाळा सहा. कै. तुकाराम सहदेव तांबे यांच्या स्मरणार्थ तालुकास्तरीय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते*.
**या स्पर्धेसाठी कणकवली तालुक्यातील जवळपास १६ शाळांनी आपला प्रत्यक्ष सहभाग नोंदवला, प्रत्येक गटातून एक विद्यार्थी संघ प्रशालेतून सहभागी झालेले होते. या देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेसाठी संगीताची आवड असणारे जिल्ह्यातील व तालुक्यातील अनेक संगीत प्रेमी, शिक्षक,मुख्याध्यापक, वादक रुंद, पत्रकार बंधू , पालक,विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते. ही स्पर्धा कणकवली तालुक्यातील संगीत कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी देशभक्तीपर गीतांची मेजवानी ठरली, प्रत्येक शाळेने समूह गीतांची पर्वणी सादर करत “याची देही याची डोळा, ऐसा देखिला देशभक्ती गीतांचा सोहळा” उत्तम, दर्जेदार, बहारदार सादरीकरण करत स्पर्धक संघांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली*.
*या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सन्मा. श्री. अभिषेक शिरसाट बुवा तसेच संगीत विशारद सन्मा.श्री. प्रफुल्ल रेवणकर यांनी देशभक्तीपर समूह गीतांचे परीक्षण करून पारदर्शक निकाल दिला*
*पहिला गट पहिली ते पाचवी यासाठी प्रथम क्रमांक- पारितोषिक विजेता संघ- वामनराव महाडिक विद्यालय तळेरे*. *सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र,रोख रक्कम,गुलाब पुष्प ,द्वितीय क्रमांक- जि.प. प्रा. शाळा दिगवळे नं १, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, रोख रक्कम गुलाब पुष्प, तृतीय क्रमांक- जि.प..प्रा.शाळा हरकुळ खुर्द गावडेवाडी,सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र,रोख रक्कम,गुलाब पुष्प. उत्तेजनार्थ- माध्यमिक विद्यालय शिवडाव, सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, रोख रक्कम,गुलाब पुष्प*
*दुसरा गट इयत्ता सहावी ते दहावी, प्रथम क्रमांक- वामनराव महाडिक हायस्कूल तळेरे, सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र, रोख रक्कम, गुलाब पुष्प. द्वितीय क्रमांक – माध्यमिक विद्यामंदिर घोणसरी, सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र,रोख रक्कम,गुलाब पुष्प, तृतीय क्रमांक( विभागुण)- माध्यमिक विद्यामंदिर कनेडी व एस.एम. हायस्कूल कणकवली, सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र,रोख रक्कम,गुलाब पुष्प*. *उत्तेजनार्थ- विद्या मंदिर हायस्कूल कणकवली, *तसेच प्रत्येक शाळेच्या सहभागी संघाला सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले*.
*या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती शालेय समिती चेअरमन सन्मा.श्री. आर.एच. सावंत, शालेय समिती सदस्य सन्मा.श्री. संतोष सावंत, सन्मा.श्री.बावतीस घोन्सलवीस, प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य मा. श्री.सुमंत दळवी, पर्यवेक्षक मा.श्री. बयाजी बुराण, तसेच प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थ्यी उपस्थित होते*.
*कार्यक्रमाचे प्रास्ताविक शालेय समिती चेअरमन, सन्मा. श्री.आर.एच. सावंत यांनी केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्रसंचालन व आभार मा.श्री. प्रसाद मसुरकर (सहा.शिक्षक) यांनी केले*.