दिल्लीत जाऊन काँगेस पक्षश्रेष्ठींचे पाय चाटायचे आणि राज्यात येऊन त्याची लायकी काढायची हीच राऊतांची प्रवृत्ती

दिल्लीत जाऊन काँगेस पक्षश्रेष्ठींचे पाय चाटायचे आणि राज्यात येऊन त्याची लायकी काढायची हीच राऊतांची प्रवृत्ती

*कोंकण Express*

*दिल्लीत जाऊन काँगेस पक्षश्रेष्ठींचे पाय चाटायचे आणि राज्यात येऊन त्याची लायकी काढायची हीच राऊतांची प्रवृत्ती*

*भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांची टीका*

*वसुली करण्या पलीकडे काही काम केल नाही ते ठाकरे सरकार पुन्हा कधीच येणार नाही*

*ठाकरे गटाच्या कोर्टातील याचिकेमुळे महापालिका निवडणुका अडकल्या आहेत*

*कणकवली ः प्रतिनिधी*

संजय राऊत ने आज पुन्हा काँगेस पक्ष आणि शरद पवार गट यांना फाट्यावर मारले आणि त्यांची पुन्हा लायकी काढली आहे. दिल्लीत जाऊन काँगेसच्या पक्षश्रेष्ठींचे पाय चाटायचे, त्यांना मुजरे करायचे आणि राज्यात येऊन छाती पुढे करून काँग्रेस आणि पवार गटावर बोलायचे ही यांची वृत्ती आहे.ठाकरे सरकारच्या काळ्या आठवणी अजून महाराष्ट्र विसरला नाही.काळ्या चपट्या पायाचे उद्धव ठाकरे मुळे राज्य अधोगतिक कडे गेलेले. वसुली करण्या पलीकडे काही काम केल नाही.असे ठाकरे सरकार पुन्हा कधीच नाही.असा रोखठोक प्रतिकार भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केला.ते कणकवली येथे पत्रकारांशी बोलत होते.
मुंबई महापालिका सकट सर्व महापालिका निवडणुका उशिरा होतं आहेत याला कारण उध्दव ठाकरे गटच आहे.या ठाकरे गटाची याचिका हायकोर्टात दाखल केली आहे. त्यामुळे निवडणुका थांबल्या हे या तीनपाट आणि ढ संजय राऊत सारख्या माणसाला माहित नाही.
तुझ्या मालकाला याचिका मागे घ्या म्हणून सांग.ज्या दिवशी ठाकरे गट याचिका मागे घेईल तेव्हा महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा होईल असेही आमदार नितेश राणे म्हणाले.रवी रांनानी भाषण करताना मिश्किल टोले लागवले होते.ह्या अडाणी माणसाला समजलं नाही. ठाकरेंचे सरकार आले कि लाडकी बहीण योजना बंद करणार असं राऊत बोलला होता. राज्यातील बहिणी सुज्ञ आहेत.तुमचे ठाकरे सरकार परत येणार नाही.आणि महायुती सरकार कायम राहणार तसेच लाडकी बहीण योजना सुद्धा कायम सुरू रहाणार आहे.असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.
मराठा ठोक मोर्चाचे कार्यकर्ते पवार साहेबांना भेटले त्यांनी घेतलेली भूमिका फार महत्वाची आहे.इतर समाजाच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही भूमिका आमच्या सरकारची आहे आणि तीच भूमिका पवार साहेबांनी मांडली आहे.आमच्या महायुती सरकारने दिलेल्या आरक्षणाला पवार साहेबांचा पाठिंबा आहे.
त्यामुळे सर्व समाजामध्ये भांडण लावण्याचा कार्यक्रम आता बंद करा.सर्वच नेत्यांची हीच भूमिका असेल तर हिंदुमध्ये फूट पाडण्याचे काम कोण करतय ?याचा शोध जनता घेईल असेही ते म्हणाले. सरकारी नोकऱ्या मुस्लिम समाजाला मिळून देण्याचा छुपा कार्यक्रम कोण करत आहे.हे कालच्या विधानावरून स्पष्ट झालंय.हिंदू म्हंणून आपण जे भांडत आहोत ते कृपया बंद करावे असेही ते म्हणले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!