जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांची माहिती.‌…

जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांची माहिती.‌…

*कोंकण Express*

*जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांची माहिती.‌…*

*टाटा कंपनी पोस्ट खात्यामार्फत वार्षिक 399 चा विमा….*

*आता काही दिवसांमध्ये गोकुळाष्टमी आली असून त्यामध्ये दहीहंडी युवक फोडत असून त्यामध्ये अनेक लोकांना अपघात होऊन मृत्युमुखी पडतात किंवा अपंगत्व कायमस्वरूपी येते यासाठी दहा लाख रुपयाची विमा कंपनीकडून आपल्याला 399 वार्षिक विमा भरल्यास नुकसान भरपाई यांना मिळते*

*त्याचप्रमाणे युवक वाहनाचा अपघातामध्ये मृत्यूमुखी पडतात किंवा कायमस्वरूपी अपंगत्व येते अशा विविध प्रकारच्या अपघातामध्ये पोस्टाकडून विमा काढल्यास त्यांना सुद्धा नुकसान भरपाई दहा लाख रुपये मिळते

*टाटा कंपनीच्या पोस्ट खात्यामार्फत वार्षिक हप्ता 399 चा 18 ते 65 वयोगट असलेल्या व्यक्तींसाठी विमा पोस्ट खात्यामार्फत अपघात विमा दहा लाखाचा कव्हरेज वारसांना मिळू शकतो*

*ग्रुप ॲक्सिडंट गार्ड पॉलिसी अपघात विमा 399 रुपये वार्षिक हप्ता १८ ते ६५ वयोगटातील व्यक्तींसाठी टाटा कंपनी मार्फत पोस्ट ऑफिस मध्ये हा विमा उतरला जाऊ शकतो*
*३९९ रुपयांमध्ये दहा लाखाची अपघाती मृत्यू झाल्यास दहा लाख रुपये वारसांना या अपघात विमा द्वारे मिळू शकतात*

*आजकालच्या युवकांना पालक नवीन व जुने वाहन खरेदी करून देतात अनेक वेळा या युवकांचा अपघाती मृत्यू होतो किंवा एखाद दुसरा अवयव अपघातामुळे निकामी होतो*

*तसेच अपघातामध्ये मणक्यास मार लागल्या तर कायमस्वरूपी अपंगत्व येते किंवा पॅलेसिस होतो अशा व्यक्तींसाठी व मृत्युमुखी पडलेल्या वारसांसाठी दहा लाख रुपयांची आर्थिक मदत मिळते कायमस्वरूपी अपंगत्व येते किंवा पॅलेसिस होतो किंवा एक अवयव निकामी होतो त्यासाठी दहा लाख रुपयांची आर्थिक मदत मिळू शकते अपघात झाल्यानंतर करावा लागणारा आंतर रुग्ण आयपीटी रुग्णालयामध्ये साठ हजार पर्यंत खर्च त्यापैकी जो कमी खर्च असेल त्याप्रमाणे एक व्यक्ति मृत्युमुखी पडल्यास त्यांच्या मुलाबाळांना एक लाख पर्यंत शिक्षणाची लाभ दोन मुलांसाठी हा लाभ मिळू शकतो*

*रुग्णालयात दाखल असताना दहा दिवसांसाठी एक हजार रुपये दिले जाऊ शकतात तसेच अपघातात झालेल्या वाहतुकीसाठी रुग्णवाहिका पंचवीस हजार पर्यंत जो कमी खर्च असेल तो दिला जातो अपघातामध्ये एखादी व्यक्ती मृत्यूमुखी पडल्यास अंत्यसंस्कारासाठी पाच हजार पर्यंत आर्थिक मदत यांच्या वारसांना दिला जातो*

*अशा या कमी खर्चाचा 399 चा वार्षिक हप्ता दरवर्षी पोस्ट खात्यामध्ये भरल्यास या विमा कंपनीकडून त्याचा लाभ मिळू शकतो*
*यासाठी 18 ते 65 वयोगट असलेल्या व्यक्तींसाठी हा विमा कंपनीकडून मिळू शकतो*

*त्यासाठी सर्व राज्यातील व जिल्ह्यातील नागरिकांनी या विमा कंपनीचा आपल्या व आपल्या मुलाच्या सुरक्षितेच्या दृष्टीने काळाची गरज असून आपली मुलं किंवा आपण मृत्युमुखी पडल्यास कुटुंबाचा आधार तुटतो आर्थिक परिस्थितीमुळे कठीण प्रसंगातून जावे लागते*

*यासाठी पोस्ट कार्यालयामध्ये आपल्या व आपल्या कुटुंबाच्या भवितव्याच्या दृष्टीने कमी खर्चाता 399 चा विमा उतरवल्यास याचा फायदा आपल्याला निश्चित होऊ शकतो अशी प्रतिक्रिया राजेंद्र प्रभाकर मसूरकर जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस यांनी प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे*

*अधिक माहितीसाठी पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन माहिती घ्यावी*

*आपला विश्वासू*
*राजेंद्र प्रभाकर मसुरकर*
*जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!