*कोंकण Express*
*विद्यामंदिर हरकूळखुर्द शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ हरकूळखुर्द*
विद्यामंदिर हरकूळखुर्द प्रशालेमध्ये शालांत परीक्षा मार्च 2024 मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व बक्षीस वितरण सोहळा बुधवार दि.7 ऑगस्ट 2024 रोजी पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा.श्री.विठ्ठलराव शिवाजी रासम (अध्यक्ष हरकूळखुर्द शिक्षण प्रसारक मंडळ,मुंबई)यांनी भूषविले तसेच मा. अँड.श्री.प्रभाकर काशिराम वालावलकर (सचिव हरकूळखुर्द शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई ) मा. श्री. गंगाधर दत्तात्रय रासम (सभासद हरकूळखुर्द शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई) मा. श्री जयप्रकाश तुकाराम हुले ( शालेय समिती सभासद )श्री.चंद्रकांत दत्तात्रय सावंत (माजी शालेय समिती सभासद) श्री.आशुतोष रासम, श्री प्रकाश रासम ,श्री धोंडी रासम (अण्णा) ,सौ.दिशा शेळके (शिक्षक पालक सदस्या)श्री तानाजी रासम आदी मान्यवर तसेच विद्यार्थी व शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाची प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. किशोर अनंत यादव यांनी केले. तसेच प्रशालेतून प्रथम क्रमांक कु.प्राजक्ता आत्माराम तेली हिचा सत्कार श्री विठ्ठल शिवाजी रासम (अध्यक्ष हरकूळखुर्द शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई)यांनी केले तर प्रशालेतून द्वितीय क्रमांक कु.सेजल सुहास रासम हिचा सत्कार अँड.श्री प्रभाकर काशिराम वालावलकर (सचिव हरकूळखुर्द शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई ) यांनी केले तसेच प्रशालेतून तृतीय क्रमांक कु.सानिया सूर्यकांत चव्हाण हिचा सत्कार मा. श्री जयप्रकाश तुकाराम हुले (शालेय समिती सभासद)यांनी केले.
तसेच श्री.तानाजी रासम , श्री. धोंडी रासम (अण्णा ), श्री.विठ्ठल शिवाजी रासम आदी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सावंत मॅडम, बक्षीसाचे वाचन श्री.गांगुर्डे सर तर आभार प्रदर्शन यादव सर यांनी व्यक्त केले.

