*कोंकण Express*
*निसर्गाच्या संतुलनासाठी साप वाचवणे आवश्यक : प्रा. जगदीश राणे*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाटमध्ये नेचर क्लब अंतर्गत नागपंचमीच्या निमित्ताने सापांविषयी माहिती देण्यात आली. त्यानिमित्ताने बोलताना सर्पमित्र प्रा. जगदीश राणे म्हणाले की निसर्गाच्या संतुलनासाठी निसर्गातील प्रत्येक प्राणीमात्राला जगण्याचा अधिकार आहे. कारण प्रत्येक प्राणि हा परस्परावलंबी आहे. त्यामुळे एकमेकांवरच ते जगत असतात. साप या प्राण्यांबरोबर आपण फार निष्ठुरपणे वागतो. दिसला की त्याला मारणे एवढेच तत्व पाळतो.जे चुकीचे आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये नाग हाच एक प्रकार नाही. त्यात अनेक प्रकार आहेत. सर्वच साप विषारी नसतात. काही बिनविषारी सुद्धा असतात. साप हे आपले मित्र आहेत. निसर्गाचा तो एक घटक आहे. त्यामुळे फक्त नागपंचमीला मातीचा नाग पूजण्यापेक्षा इतर दिवसातही त्यांचा जीव वाचवला पाहिजे. असे प्रतिपादन केले.
त्यानंतर त्यांनी सापांविषयी माहिती दिली. बिनविषारी,विषारी, निम विषारी असे प्रकार असतात. कोणत्या भागात कोणते साप सापडतात. याचे ज्ञान देऊन साप पकडण्याच्या तंत्राची सुद्धा माहिती करून दिली व विद्यार्थ्यांना सर्पमित्र बनण्याचे आवाहन केले.
आपल्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्रभारी प्राचार्य डॉ. संतोष रायबोले म्हणाले की सापांची संख्या दिवसेंदिवस कमी कमी होत चालली आहे. त्याला कारण म्हणजे आपणच माणस आहोत.एक तर आपण निसर्ग तोडून सिमेंटची जंगल उभारत आहोत. त्यात त्यांची घरे नष्ट होत आहेत. त्यामुळे ते घरात येऊ लागले आणि नंतर आपण त्यांना मारून टाकू लागलो आहोत. त्यामुळे आपण त्यांचे मित्र बनून त्यांना वाचवण्याचे काम केले पाहिजे केले पाहिजे. तसे केले तर समाजाचे काम केल्याचे समाधान मिळेलच शिवाय निसर्ग वाचवायला मदत होईल. असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाला महाविद्यालयाचा सर्व कर्मचारी वर्ग व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.