सावंतवाडी : दि १९ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा गेले काही दिवस जाणवू लागला आहे. सावंतवाडीतील युवा रक्तदाता संघटनेचे (देव्या सूर्याजी ग्रुप) चे पदाधिकारी गौतम माठेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आणि एस एस पीएम हाॅस्पिटल पडवे रक्तपेढीमध्ये कोरोना परिस्थितीमुळे रक्ताचा तुटवडा असल्या कारणाने पडवे येथे स्वतः जाउन जाउन दहा रक्तदात्यांनी रक्तदान केले.गौतम माठेकर,पार्थिल माठेकर,रोहीत ठाकूर,प्रभाकर वडार,जय राणे,संदेश गावडे,जय बांदेकर,अभिजीत गवस,अमेय मोघे आदींनी पडवे येथे यांनी रक्तदान केले. याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. याचीच दखल घेत रक्तदान केलेल्या युवकांचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्या हस्ते गौरवाचे प्रमाणपत्र देत अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी,माजी सभापती मंगेश तळवणेकर तसेच रक्तदाते उपस्थित होते. तर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्ण भगवान परब यांना AB+ पाॅझिटीव्ह या रक्तगटाची अत्यंत तातडीने आवश्यकता होती तेव्हा युवा रक्तदाता संघटनेचे गणेश यादव यांनी तातडीने जाउन रक्तदान केले व रुग्णाचा जीव वाचवण्यात मोलाची भूमिका पार पाडली.याबद्दल युवा रक्तदाता संघटनेचे सर्व स्तरात कौतुक होत आहे.संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानले.
