माध्यमिक विद्यामंदिर कनेडी हायस्कूलमध्ये दिनांक १३ ऑगस्ट रोजी तालुकास्तरीय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन

माध्यमिक विद्यामंदिर कनेडी हायस्कूलमध्ये दिनांक १३ ऑगस्ट रोजी तालुकास्तरीय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन

*कोंकण Express*

*माध्यमिक विद्यामंदिर कनेडी हायस्कूलमध्ये दिनांक १३ ऑगस्ट रोजी तालुकास्तरीय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन*

*कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड काॅमर्स कनेडी, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स कनेडी आणि बालमंदिर कनेडी येथे मंगळवार दिनांक १३ ऑगस्ट २०२४ रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून माजी गुरुवर्य पुरस्कृत तालुकास्तरीय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे*.

*या स्पर्धेसाठी समूहगीताचे बंधन नाही. प्रत्येक गटातून एक विद्यार्थी संघ प्रशालेतून पाठवावयाचा आहे. १० ऑगस्ट २०२४ पर्यंत आपली नावे सौ. एस.एम. न्हिवेकर मॅडम (सहा शिक्षिका) मो. ९४२२४६४७४७ या नंबर वर पाठवावीत. स्पर्धेसाठी प्रत्येक गटातील प्रथम तीन क्रमांकांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कमेची पारितोषिक दिली जाणार आहेत.ही स्पर्धा दोन गटात असून सकाळी १० वाजता स्पर्धा सुरू होईल. पहिला गट (पहिली ते पाचवी) यासाठी प्रथम पारितोषिक रू.२०००/- , द्वितीय रू. १५००/-, तृतीय रू. १०००/- व उत्तेजनार्थ रू. ७००/- असणार आहेत. सहावी ते दहावी हा दुसरा गट असून प्रथम पारितोषिक रू. २५००/-, द्वितीय रू. २०००/-, तृतीय रू. १५००/- व उत्तेजनार्थ रू. १०००/- असणार आहे. तसेच प्रत्येक क्रमांक प्राप्त संघांना सन्मानचिन्ह सुद्धा दिले जाणार आहे.*

*यात प्रत्येक समूहामध्ये किमान तीन व कमाल आठ विद्यार्थी असावेत. समूहगीताचा कालावधी कमीत कमी तीन मिनिटे व जास्तीत जास्त सहा मिनिटे असावा. इलेक्ट्रॉनिक वाद्यांचा समावेश करता येऊ शकेल. संघाने ठरवून दिलेल्या वेळेत उपस्थित राहणे बंधनकारक आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. प्रत्येक संघाने स्वतःची वाद्ये व वाद्यवृंद यासह उपस्थित राहावे. तरी या स्पर्धेसाठी शाळांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन माध्यमिक विद्यामंदिर कनेडी हायस्कूलचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री. सुमंत दळवी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी श्री. सुमंत दळवी (मुख्याध्यापक/प्राचार्य). मो. ९४२०२०६५०८ व श्री.बयाजी बुराण(पर्यवेक्षक) मो ९४२११४४६०५ यांच्याशी संपर्क साधावा.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!