*कोंकण Express*
*देवगड तालुका पुरळ जि.परिषद येथील शिवसैनिक व भाविक तिरुपती दर्शनासाठी रवाना*
*युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी कोल्हापूर येथे दिली भेट*
*कणकवली ः प्रतिनिधी*
देवगड तालुक्यातील पुरळ जिल्हा परिषद मधील शिवसैनिक व नागरिक आज कोल्हापूर येथून तिरुपती दर्शनासाठी रवाना झाले. यावेळी माजी सरपंच सुनील तेली यांनी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्याशी संवाद साधून त्यांना येण्याची विनंती केली, त्यांच्या विनंतीस मान देऊन युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी कोल्हापूर येथे भेट देत प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.पुरळ जिल्हा परिषद वरून निघालेल्या भाविकांना युवासेना जिल्हाप्रमुख यांनी अल्पपहार ची सेवा दिली. यावेळी पुरळ जिल्हा परिषद येथील 150 भाविक तिरुपती दर्शनासाठी रवाना झाले.
यावेळी शाखा प्रमुख- संतोष मंचेकर, युवा प्रमुख -अभिजीत जावकर ग्रा पं सद्दस्य- सिद्धेश डोंगरे ,प्रसाद शेडगे, योगेश डोंगरे, रामेश्वर उप सरपंच मिलेश मोंडे, निलेश शिरगावकर, बालाजी भक्त तुळसुंदे अद्यक्ष – देविदास अडिवरेकर,चेतन हिरणाईक ,समित मीठबावकर आदी शिवसैनिक व भाविक उपस्थित होते.