*कोकण Express*
*शिवसेनेचा पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधातील मोर्चा धडकला तहसील कार्यालयावर..*
*पेट्रोल-डिझेल व गॅस आदी इंधनांचे भाववाढीस भाजप सरकार जबाबदार; शिवसैनिकांचे तहसीलदार यांना निवेदन*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात आज येथील शिवसेनेच्या वतीने तहसीलदार कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी केंद्र सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान याबाबत तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, युवासेना उपजिल्हाधिकारी सागर नाणोसकर, अपर्णा कोठावळे, सुरेंद्र बांदेकर, प्रशांत कोठावळे सुरेश भागटे, शब्बीर मणियार,प्रतीक बांदेकर, आबा सावंत दिनेश सावंत, अशोक दळवी,भरती मोरे, चंद्रकांत कासार, योगेश नाईक, विनायक सावंत, एकनाथ नारोजी, चित्रा धुरी, रश्मी माळवदे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पेट्रोल-डिझेल आणि गॅस आदी इंधनांचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. याला सर्वस्वी केंद्रात असलेले भाजप सरकार जबाबदार आहे. त्यामुळे अशा सरकारचा शिवसेनेकडून निषेध करण्यात आला. या निषेधार्थ बैलगाडीसह डोक्यावर सिलेंडर आणि केंद्र सरकारच्या विरोधातील फलक घेऊन कार्यकर्त्यांनी मोर्चात सहभाग घेतला. या मोच्याला आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयातून सुरुवात करण्यात आली. तर बाजारपेठेतुन हा मोर्चा थेट येथील तहसील कार्यालयावर धडकला.