आदित्य वनवे याची सलग तिसऱ्यांदा कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड

आदित्य वनवे याची सलग तिसऱ्यांदा कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड

*कोंकण Express*

*आदित्य वनवे याची सलग तिसऱ्यांदा कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड.*

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ,सिंधुदुर्ग व जिल्हा क्रीडा परिषद ,सिंधुदुर्ग आयोजित जिल्हास्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेत विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला,कणकवलीच्या कु.आदित्य वनवे द्वितीय क्रमांक पटकावला असल्याने त्याची सलग तिसऱ्या वर्षी कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. गेली दोन वर्ष जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला होता. सलग तीन वर्षे विभागीय स्पर्धेत स्थान मिळवल्याने आदित्यचे खास अभिनंदन सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी तथा अवर सचिव -मंत्रालय, मुंबई मा.आरती देसाई मॅडम यांनी केले आहे.
आदित्यने स्पर्धेत सुयश प्राप्त केल्याने शिक्षण प्रसारक मंडळ, कणकवलीचे अध्यक्ष श्री. दत्तात्रय तवटे,चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे,सचिव श्री.विजयकुमार वळंजू आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. पी.जे.कांबळे,पर्यवेक्षिका सौ.व्ही.व्ही.जाधव व सर्व शिक्षक शिक्षकेतर यांनी अभिनंदन केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!