*कोकण Express*
*जुलमी आणि अत्याचारी केंद्र सरकार विरोधात हा उद्रेक ; संदेश पारकर*
*बैलगाडी व गाजर दाखवत शिवसेनेने केला निषेध….!*
*तर मोदी – शहा जोडगोळीचे शेतकऱ्यांकडे दूर्लक्ष…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
केंद्रातील मोदी सरकार हे जाचक व हुकूमशाही पद्धतीने वागत असून पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने होणारी वाढ, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे केले जाणारे दूर्लक्ष. यामुळे शेतकरी गेले दोन महिने दिल्ली येथे आंदोलन करत आहेत. तसेच कृषी कायदा रद्द करावा. ही शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. ही मागणी मान्य न करता. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे उत्तर मोदी शहा ही जोडगोळी देत नाही. म्हणून जनतेच्या व शिवसेना पक्षाच्या भावनांचा महाराष्ट्र व देशभर उद्रेक आहे.
मोदी शहा भाजपच्या सरकारच्या विरोधातील हा उद्रेक म्हनून हजारोच्या संख्येने जनता एकवटली असून हा एल्गार पुकारला आहे. जो पर्यंत पेट्रोल डिझेल भाव कमी होत नाही.तसेच शेतकऱ्याना या देशात न्याय मिळत नाही. तो पर्यंत अशाच पद्धतीने रस्त्यावरून आंदोलने करत राहणार आहोत. केंद्र सरकार आणि मोदींना जाग आणण्यासाठी शिसवेना व जिल्हावासीयांच्या वतीने प्रतिकात्मक स्वरूपात बैलगाडी व गाजर दाखवून निषेध करत जनतेच्या उद्रेकाला वाट करून दिली आहे. पेट्रोल डिझेल दरवाढीने सर्वसामान्य माणसाचे बझेट कोलमडले असून हे सरकार जुलमी व अत्याचारी आहे. म्हणून त्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आल्याचे शिसवेना नेते संदेश पारकर यांनी सांगितले.
