क्रिकेट स्पर्धेतून अनेक दर्जेदार खेळाडु घडतील ; संदेश पारकर

क्रिकेट स्पर्धेतून अनेक दर्जेदार खेळाडु घडतील ; संदेश पारकर

*कोकण Express*

*क्रिकेट स्पर्धेतून अनेक दर्जेदार खेळाडु घडतील ; संदेश पारकर*

*हिंदुहृदयसम्राट चषक २०२१ क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ….!*

*धनंजय हिर्लेकर मित्रमंडळ नाधवडे आयोजित क्रिकेट स्पर्धा…*

*कणकवली ः प्रतिनिधी*

नाधवडे सारख्या ग्रामीण भागात भगव वादळ पहायला मिळाल. यामुळे कणकवली क्रिकेट स्पर्धेची आठवण या निमित्ताने झाली. क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य असे अनेक उपक्रम धनंजय हिर्लेकर मित्रमंडळाच्या वतीने राबवले जातात. हे स्तुत्य उपक्रम असून गावाच्या विकासाची जबादारी ही येथील प्रत्येक तरुणांची आहे. यातूनच एखादा कार्यकर्ता घडत असतो. असाच माहोल हा वैभववाडी मध्ये तयार केला जावा. यासाठी सर्वतोपरी मदत करू. या गावाने ग्रा.पं. निवडणुकीत वेगळं चित्र निर्माण करण्याचे काम येथील कार्यकर्त्यांनी केल. ठाकरे सरकार च्या माध्यमातून अनेक विकास काम हाती घेण्यात आली आहेत. विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लागत आहेत. जनतेची स्वप्न या सरकारच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने पूर्ण होताना दिसत आहेत. क्रिकेट हा खेळ आबालवृद्धांमुळे नावारूपाला आला आहे. लेदर क्रिकेट मधून अनेक खेळाडू चमकलेत. अशाच पद्धतीने या क्रिकेट स्पर्धेतून अनेक दर्जेदार खेळाडु घडतील त्यासाठी परिश्रण महत्वाचे असल्याचे प्रतिपादन युवानेते संदेश पारकर यांनी केले.

धनंजय हिर्लेकर मित्रमंडळ नाधवडे आयोजित ओव्हआर्म क्रिकेट स्पर्धा “हिंदुहृदयसम्राट चषक २०२१” च्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मयूर धूमक, शंकर कोकरे, नाना बंड, नारायण धुळप, विजय तावडे, संजय हिर्लेकर, सुनील पांचाळ,राहुल इसवलकर, संदीप शेणवी, राजेश तावडे आदी खेळाडू, ग्रामस्थ उपस्थित होते.

यानिमित्ताने नाधवडे गावातून मोटार सायकल रॅली काढण्यात आली.शिवसेना जिंदाबाद….कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यामुळे नाधवडे गावात भगवे वातावरण तयार झाले होते. संदेश पारकर यांचा सत्कार मंडळाच्या वतीने करणयात आला.

नाधवडे ब्राम्हदेव मैदानात ही स्पर्धा घेण्यात आली. तीन दिवस चालणाऱ्या यास्पर्धेत ३० संघानी सहभाग घेतला होता.पहिला सामना विठ्ठलादेवी,सोनाळी विरुद्ध युवा सुतार नाधवडे असा खेळवण्यात आला.ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी धनंजय हिर्लेकर मित्रमंडळाचे कार्यकर्ते मेहनत घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!