लोकमान्य टिळकानी देशाच्या तर अण्णाभाऊंनी माणसाच्या स्वातंत्र्य लढ्याला दिशा देण्याचे काम केले

लोकमान्य टिळकानी देशाच्या तर अण्णाभाऊंनी माणसाच्या स्वातंत्र्य लढ्याला दिशा देण्याचे काम केले

*कोंकण Express*

*लोकमान्य टिळकानी देशाच्या तर अण्णाभाऊंनी माणसाच्या स्वातंत्र्य लढ्याला दिशा देण्याचे काम केले*

*लेफ्टनंट डॉ. राज ताडेराव*

*फोंडाघाट ः प्रतिनिधी*

येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाटमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे प्रास्तावित करताना सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. विनोदसिंह पाटील म्हणाले की अगदी बालपणापासून या महान नेत्यांची नावे आपण ऐकली आहेत. अण्णाभाऊचा सुरुवातीला लोकांना परिचय नव्हता परंतु परिवर्तनाच्या काळात अण्णाभाऊंच्या कार्याचा, लेखनाचा परामर्श घेतला गेला. त्यांच्या साहित्यातून वंचित दलित दबलेल्या माणसांचा आवाज बुलंद त्यांनी केला. असे मत व्यक्त केले.

नंतर लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संतोष रायबोले व प्रमुख वक्ते लेफ्ट. डॉ. राज ताडेरावयांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

आपल्या मनोगतात लेफ्ट. डॉ. राज ताडेराव म्हणाले की लोकमान्य टिळक यांनी देशाच्या तर अण्णाभाऊ साठे यांनी माणसाच्या स्वातंत्र्याला दिशा देण्याचे काम केले. टिळक हे कोकणातले रत्न आहे. त्यांची जडणघडण पुण्यात झाली. पारतंत्र्यात जन्म झाला. गणित आणि संस्कृत या विषयात ते पारंगत होते. संघर्ष करणे हा त्यांचा स्वभाव होता. स्वदेशी, बहिष्कार,राष्ट्रीय शिक्षण व स्वराज्य या चार तत्त्वांचे पुरस्कर्ते होते. जहाळ आणि आक्रमक नेतृत्व हे टिळकांचे वैशिष्ट्ये होते.

अण्णाभाऊ साठे हे वर्ण व्यवस्थेला बळी पडणाऱ्या समाजातून आले. समतेच्या चळवळीत त्यांनी काम केले. पृथ्वी शेषाच्या फणेवर तरली नसून कष्टकऱ्यांच्या तळ हातावर आहे असे जहाल मत व्यक्त केले. अण्णाभाऊंनी सर्व प्रकारचे साहित्य हाताळले. असे करणारे ते जगातील एकमेव साहित्यिक आहेत. समता आणि मानवतावादाचे पुरस्कर्ते होते. या समाजातला माणूसच इतिहास घडू शकतो. रडण्यासाठी जगू नका,जगण्यासाठी लढा. हा मंत्र त्याने कामगाराना दिला.कष्टकऱ्यांचे जीवन आपल्या साहित्यातून मांडले. गावा कुसाबाहेरील माणसांना त्यानी आपल्या साहित्याचे नायक बनवले. त्यामुळे ते साहित्यसम्राट, जननायक बनले.

अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ. संतोष रायबोले म्हणाले की या दोन्ही मानवानी आपल्या जागेवर देशासाठी आणि समाजासाठी फार मोठे काम केले. दीड दिवस शाळेत गेलेल्या व्यक्तीने एवढे मोठे साहित्य निर्माण केले ते साहित्य एवढे महान आहे की ज्यांना समतेवर बोलण्याचा अधिकार नाही हे वर्गात बसून अण्णाभाऊंच्या साहित्यावर पी.एच.डी. करत आहेत. त्यांनी साहित्यसम्राट म्हणून संबोधले गेले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उपाशीपोटी जाऊन त्यांनी जनजागृती केली आणि अखंड महाराष्ट्र निर्माण केला. या अण्णाभाऊंना रशियाचे सरकार सन्मान करते. त्यामुळे या दोन्ही व्यक्तींच्या कार्याचा आपण सन्मान केला पाहिजे. असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विनोदसिंह पाटील यांनी तर आभार प्रा. जगदीश राणे यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व कर्मचारी वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!