*कोंकण Express*
*कासार्डेतील शावाजी डोईफोडे या चित्रकाराने बेलाच्या पानावर रेखाटले शिवशंकराचे चित्र*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
श्रावण महिन्याला सणांचा राजा असे संबोधले जाते. कारण या विशिष्ट महिन्यात प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व प्रदान करण्यात आलेले आहे. श्रावण महिन्यात सोमवारी भगवान शंकराचे पूजन केले जात श्रावण महिन्याला सुरवात होत असताना कणकवली तालुक्यातील कासार्डेतील चित्रकार श्री. शिवाजी डोईफोडे यानी श्रावण महिन्याच्या पूर्वसंध्येलाच बेलाच्या पानावर भगवान शंकराचे चित्र हुबेहूब रेखाटले. त्याचबरोबर हर हर महादेव, ॐ नमो शिवाय लिहून आपली कला दाखवून दिली असून त्याच्या चित्राची शोशल मिडियावर एकच चर्चा होत आहे.