*कोंकण Express*
*सेवानिवृत्त कला शिक्षक श्री.जनार्दन उर्फ जे.जे.दळवी यांचे निधन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील कळसुली गवसेवाडी येथील रहिवासी तथा कळसुली इंग्लिश स्कूल कळसुली हायस्कूल चे सेवानिवृत्त कला शिक्षक श्री.जनार्दन जयसिंग दळवी उर्फ जे.जे.सर (वय ७२) यांचे रविवारी ४ ऑगस्ट रोजी रात्री २:३० वाजण्याच्या दरम्यान कणकवली येथील निवासस्थानी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.
त्यांचे पार्थिव कळसुली गवसेवाडी येथील निवासस्थानी सकाळी ११ वाजता आणण्यात आले. सायंकाळी पाच वाजता कळसुली भोगनाथ वाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी कळसुलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील विविध मंडळी मोठया संख्येने उपस्थित होती.यावेळी विविध क्षेत्रातील मंडळींनी जे.जे.सरांच्या आठवणींना उजाळा देवून श्रद्धांजली अर्पण केली.
श्री.जे.जे.दळवी उत्कृष्ट कला आणि क्रीडा शिक्षक आणि नामवंत चित्रकार आणि गणेश मूर्तीकार , उत्कृष्ट हामौनियम वादक म्हणून प्रसिद्ध होते.
कळसुली शिक्षण संघाच्या स्थानिक कार्यक्रमांमध्ये त्यांनी अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या.कळसुली हायस्कूल च्या शैक्षणिक प्रगती मध्ये त्यांचे चांगले योगदान राहिले आहे.
सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान राहिले आहे .मनमिळाऊ आणि विद्यार्थी प्रिय शिक्षक, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व अशी त्यांची विशेष ओळख होती.त्यांच्या निधनामुळे कळसुली गावावर शोककळा पसरली होती.त्यांच्या जाण्याने कळसुली सह कणकवली तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे,सुना, विवाहित मुलगी,जावई,वडील, दोन भाऊ,भावजय, पुतणे,पुतणी, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षिका स्नेहलता दळवी यांचे ते पती तर सिव्हिल इंजिनिअर श्री.मिथिल आणि श्री.सुशांत दळवी यांचे ते वडील आणि कळसुली हायस्कूल च्या शिक्षिका सौ.अंजली दळवी यांचे ते सासरे होत.