*कोंकण Express*
*कौशल्या धिष्ठित शिक्षण व डिजिटल क्रांतीतून नवीन पिढीसाठी भरपूर संधी उपलब्ध : श्रद्धा नाईक*
शिक्षण सप्ताह कौशल्य डिजिटल उपक्रम अंतर्गत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय संयुक्त कट्टा या ठिकाणी एमकेसीएल स्मिता कॉम्पुटर कट्टा च्या केंद्र संचालिका श्रद्धा नाईक यांनी डिजिटल उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या कार्यशाळेत हे उद्गार काढले
या कार्यक्रमांतर्गत अकरावी व बारावीच्या मुलांना एमकेसीएल करिअर ॲप चे सादरीकरण करताना इन्स्टॉलेशन आणि यामध्ये असणाऱ्या विविध टेस्ट, व्हिडिओज,तज्ञांचे मार्गदर्शन, फ्री प्रॅक्टिस टेस्ट,करिअर चार्ट व्हिडिओ, करिअर गायडन्स व्हिडिओज आणि MKCL च्या इतर कोर्सची विषयी माहिती देण्यात आली त्याचप्रमाणे AI आणि ML याविषयी प्रेझेंटेशन दाखवण्यात येऊन, प्रॅक्टिकल सुद्धा दाखवण्यात आले
* या कार्यशाळेत विद्यार्थिनींना भविष्यातील करीअरच्या संधी साठी आता पासूनच तयार रहाण्याचे आवाहन करण्यात करताना
* कृत्रिम बुद्धिमत्ता (A.I.) आणि मशीन लर्निंग (M.L.) या नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यात आली.
A.I. आणि M.L. चे वाढते महत्व म्हणजे भविष्यातील जग हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असणार असल्याचे स्पष्ट केले.कृतीयुक्त सादरीकरण केल्यामुळे A.I. आणि M.L. या विषयांबद्दल जाणिव निर्माण झालीप्रा. श्री एन एम मासी सर यांनी उपस्थित विध्यार्थ्यांना MKCL आणि स्मिता कम्प्युटर या संस्थेची माहिती देताना संस्था अंतर्गत होणारे उपक्रम व सेवाभावी वृत्ती जपणारी संस्था म्हणून नावारूपास आलेली व परिसरातील तंत्रज्ञान देणारी एकमेव संस्थे विषयी माहिती दिली.
कार्यक्रमच्या सुरुवातीस कारगिल शहीद जवानांना तसेच प्रशाळेचे मुख्याध्यापक स्वर्गीय संजय नाईक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली कार्यक्रमास हायस्कूल च्या मुख्याध्यापिका सौ. देवयानी धनंजय गावडे श्री भाट महेश विठ्ठल श्रीमती जे एन मालवदे श्री राऊळ प्रा.परुळेकर प्रा.जांभवडेकर,प्रा.भुजबळ मॅडम सौ सुकाळे मॅडम, श्री देसाई , सौ कानूरकर व स्मिता कॉम्पुटर च्या तंत्रज्ञा सविता शिरोडकर व इतर शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.