*कोकण Express*
*तालुका व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी दीपक बेलवलकर*
*तालुका व्यापारी संघटनेची कार्यकारणी जाहीर…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
तालुका व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी दीपक बेलवलकर यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.कणकवली साई पॅलेस येथील कार्यकारिणी सदस्यांची बैठक गुरुवारी सायंकाळी पार पडली.यावेळी एकमताने ही निवड करण्यात आली आहे.
कार्यकारणी निवड पुढीलप्रमाणे – अध्यक्ष – दीपक बेलवलकर,उपाध्यक्ष – राजन पारकर, सेक्रेटरी- विलास कोरगावर, खजिनदार- अमोल कामत आदींची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
माजी अध्यक्ष विशाल कामत व जिल्हा कार्यकारणी सदस्य महेश नार्वेकर यांनी नुतन कार्यकारणी सदस्यांचे अभिनंदन केले.
यावेळी बंडू खोत,हेमंत गोवेकर, राजू गवाणकर,राजा राजाध्यक्ष,अनिल अनावकर,श्री.चव्हाण, आनंद पोरे,सुशील पारकर,संतोष काकडे, नंदू उबाळे,सुजित जाधव,निवृत्ती धडाम, सुभा गावकर, आदी उपस्थित होते.