*कोंकण Express*
*पक्षासाठी रात्रंदिवस धडपडणारे निष्ठावान कार्यकर्ते हीच माझी खरी संपत्ती…*
*विशाल परब; बांदा मंडल उपाध्यक्ष उमेश पेडणेकर यांचा वाढदिवस उत्साहात…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
मैत्रीचे नाते हेच राजकीय वाटचालीचे सूत्र असून उमेश पेडणेकर सारखे पक्षासाठी रात्रंदिवस धडपडणारे निष्ठावान कार्यकर्ते हीच माझी खरी संपत्ती आहे, असे प्रतिपादन भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी केले. भाजपा बांदा मंडलाचे उपाध्यक्ष उमेश पेडणेकर यांचा वाढदिवस आज भाजपा युवा मोर्चाच्या कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी श्री. परब बोलत होते.
यावेळी वेत्ये ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र गावकर, इन्सुली बुथ अध्यक्ष अमेय कोठावळे, वेत्ये बुथ अध्यक्ष गोविंद गावडे, इन्सुली माजी ग्रा.पं.
सदस्य प्रताप सावंत, महेंद्र सावंत, महेंद्र पालव, औदुंबर पालव, अभय आजगांवकर, राजाराम धुरी आदींसह युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित
होते.