केंद्र सरकारच्या अन्यायकारक पेट्रोल व डिझेल दरवाढ विरोधात कणकवलीत शिवसेनेचा भव्य निषेध मोर्चा

केंद्र सरकारच्या अन्यायकारक पेट्रोल व डिझेल दरवाढ विरोधात कणकवलीत शिवसेनेचा भव्य निषेध मोर्चा

*कोकण Express*

*केंद्र सरकारच्या अन्यायकारक पेट्रोल व डिझेल दरवाढ विरोधात कणकवलीत शिवसेनेचा भव्य निषेध मोर्चा*

*शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत*

*कणकवली ः प्रतिनिधी*

केंद्र सरकारच्या अन्यायकारक पेट्रोल व डिझेल दरवाढ विरोधात कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने उद्या शुक्रवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजता पटकीदेवी मंदिर ते प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
या मोर्चाला शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख श्री.अरुणभाई दुधवडकर, शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार श्री.वैभव नाईक, लोकसभा सहसंपर्कप्रमुख श्री.आप्पाभाई पराडकर, जिल्हाप्रमुख श्री.संजय पडते, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष श्री.सतिश सावंत, कोकण सिंचन महामंडळ माजी उपाध्यक्ष श्री.संदेश पारकर, श्री.अतुल रावराणे तसेच आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थिती राहुन मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत.
तरी कणकवली तालुक्यातील सर्व शिवसेना, युवासेना, महिला तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शहरप्रमुख, उपशहरप्रमुख, नगरसेवक, नगरसेविका, उपशहरप्रमुख, जि.प.सदस्य, प.स.सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रा.प.सदस्य, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, बुथप्रमुख आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!