*कोंकण Express “
*तिवरे धरण फुटून झालेल्या दुर्घटनेत अठरा जणांच्या मृत्यूप्रकरणी राज्य मानवी हक्क आयोग मुंबई न्यायालयात सुनावणी सुरू*
*ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने याबाबतची तक्रार दाखल*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
रत्नागिरी दिनांक 2/7/ 2019 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे गावातील तिवरे धरण फुटून अठरा जणांचा मृत्यू व अन्य दहा जण बेपत्ता झाल्या प्रकरणी या सगळ्या गोष्टीस कारणीभूत असलेल्या जिल्हाधिकारी,अभियंता, जनसंपदा मंत्रालय व बांधकाम कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांच्या परिवारास न्याय मिळावा म्हणून ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष एम्.डी.चौधरी यांनी दिनांक 8/ 7 /2019 रोजी राज्य मानवी हक्क आयोग मुंबई न्यायालयात यासंदर्भात एक तक्रार याचिका दाखल केली होती. या याचिकेची राज्य मानवी आयोगाने गंभीर दखल घेऊन रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटून झालेल्या अठरा लोकांचा मृत्यू व अन्य दहा जण बेपत्ता झाल्याची घटना व त्याला जबाबदार असणारे शासन, प्रशासन यंत्रणा जिल्हाधिकारी, जलसंपदा मंत्रालय, अभियंता, ठेकेदार हे जबाबदार असून सदरच्या धरणाचे काम निकृष्ट दर्जाचे बांधकाम करून करण्यात आल्याची बाब उघड झाली होती. त्याचबरोबर प्रशासनाच्या चुकीच्या कारभारामुळे धरण फुटून अठरा जणांचा हकनाक बळी गेला होता.
तिवरे धरण 2005 साली बांधण्यात आलेले होते. ते पंधरा वर्षातच फुटून मनुष्यहानी झाली होती. सदर धरण कमीत कमी शंभर वर्ष टिकणे अपेक्षित असतांना देखील मुळातच धरणाचे बांधकाम निकृष्ट पध्दतीचे झाल्यामुळे ते धरण अचानक रात्री फुटले होते. या धरणासंबंधी राज्याचे तत्कालीन जलसंधारण मंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी तिवरे धरण हे खेकड्यामुळे फुटल्याचे असे बेजबाबदार वक्तव्य केले होते. या प्रकरणी संबंधित मंत्र्याची देखील चौकशी व्हावी व निकृष्ट धरण बांधल्याप्रकरणी संबंधितावरती कठोर कारवाई करण्यात यावी आणि हकनाक मृत्यूमुखी पडलेल्या ग्रामस्थांच्या नातेवाईकांना आर्थिक नुकसान भरपाई मिळण्यात यावी अशाप्रकारची तक्रार दाखल करून सदर प्रकरणाची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी व्हावी अशा पद्धतीची याचिका ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष एम्.डी.चौधरी यांनी राज्य मानवी हक्क आयोग मुंबई येथे दाखल केली होती. याप्रकरणाची सध्या सुनावणी सुरू झाली आहे. याप्रकरणी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

