*कोकण Express*
*बांदा-दोडामार्ग रस्ता डांबरीकरणासाठी बांद्यात रास्ता रोको*
*सरपंच अक्रम खान यांच्यासह शेकडो नागरिक रस्त्यावर*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
बांदा – दोडामार्ग मार्गाच्या डांबरीकरणासाठी बांदा ग्रामस्थांच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेकडो नागरिकांसह महिलांचीही लक्षणीय उपस्थिती आंदोलनाला आहे. आंदोलनामुळे मार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. खड्ड्यांमुळे होणार्या अपघातांना जबाबदार कोण? असा सवाल संतप्त ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांसमोर उपस्थित करत उशिरापर्यंत आंदोलन सुरू होते.
यावेळी माजी जि. प. उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, जि. प. सदस्य श्वेता कोरगावकर, उपसभापती शीतल राऊळ, बांदा सरपंच अक्रम खान, दोडामार्ग माजी नगराध्यक्ष संतोष नानचे, सावंतवाडी भाजप कार्यकारिणी सदस्य अमित परब, सरचिटणीस दादू कविटकर, ग्रा. पं. सदस्य मकरंद तोरसकर, सर्फराज खान, गुलजार खान, सुर्यकांत वराडकर, डेगवे उपसरपंच प्रविण देसाई, आनंद सावंत, संतोष सावंत, बाळा आकेरकर आदींसह शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले होते. न्याय मागण्यांसाठी उशिरापर्यंत आंदोलन सुरू होते.