विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज कणकवलीत पक्षनिरीक्षकांची बैठक

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज कणकवलीत पक्षनिरीक्षकांची बैठक

*कोंकण Express*

*विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज कणकवलीत पक्षनिरीक्षकांची बैठक*

मनसे अध्यक्ष सन्मा. *श्री. राजसाहेब ठाकरे* यांच्या आदेशानुसार आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर *कणकवली विधानसभा* मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मते जाणून घेण्यासाठी तसेच विधानसभा निवडणुकीबाबत चाचपणी करण्यासाठी विधानसभा निवडणुक पक्ष निरीक्षक मनसे नेते व* *चित्रपट सेनेचे अध्यक्ष मा. श्री अमेय खोपकर व* *मा श्री बंटी म्हशीलकर* हे उद्या गुरुवार दिनांक १ ऑगस्ट *
रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून संध्याकाळी 4:00 वाजता शासकीय विश्रामगृह कणकवली च्या हॉलवर बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी या बैठकीला कणकवली विधानसभा मतदान संघातील सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी यांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन कणकवली विधानसभा संपर्क अध्यक्ष श्री संतोष शिंगाडे व कणकवली तालुका अध्यक्ष श्री शांताराम सादये केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!