*कोकण Express*
*सिंधुदुर्गात ७० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची ११ फेब्रूवारीला होणार निवडणूक*
*सर्वच राजकीय पक्षात होणार चुरस;सरपंच पदासाठी इच्छुकांची मोर्चे बांधणी*
*सिंधुदुर्ग ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणुका पार पडलेल्या ७० ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची निवडणूक ११ फेब्रूवारीला होणार आहे. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी माहिती दिली.त्यानुसार सरपंच पदासाठी इच्छुकांची जोरदार मोर्चे बांधणी होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ७० ग्रामपंचायतींच्या निवडणुका १५ जानेवारीला जाहिर झाल्या होत्या.ग्रामपंचायत निकाल १८ जानेवारीला जाहीर झाला होता. २८ जानेवारीला जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण जाहीर झाले. सरपंच निवाडीसाठी ११ फेब्रुवारीला कार्यक्रम करण्यात आला आहे.
आता मोर्चेबांधणीला येणार गती…
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायत निवडणुका झाल्या आहेत.आता सरपंच आपल्याच पक्षाचा बसावा, गाव आपल्या ताब्यात रहावा,यासाठी सर्वच राजकिय पक्ष प्रयत्न करणार आहेत.सर्वात जास्त चुरस भाजपा विरुद्ध शिवसेना अशी असणार आहे.