वेंगुर्ला : दि २२ : होडावडा ग्रामस्थांच्यावतीने होडावडा गावात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. दोन टप्प्यात घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला एकूण ५९ रक्तदात्यांनी रक्तदान केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या सोशल डिस्टनसिंग च्या नियमांचे काटेकोर पालन करून रक्तदान शिबिर यशस्वी केले. या शिबिरामध्ये होडावडा गाववासीयांन बरोबर तळवडे आणि वजराठ गावातील ग्रामस्थांचा प्रतिसाद लाभला. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष ज्यांनी सहकार्य केले त्यांचे होडावडा ग्रामस्थवतीने मनःपूर्वक आभार. हे शिबीर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामुळे यशस्वी होऊ शकले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होडावडा गावात रक्तदान शिबीर यशस्वी रित्या पूर्ण केल्यामुळे सर्वच स्तरावरून होडावडा ग्रामस्थचे कौतुक होत आहे.
